Parvin Dabas Accident Update : अभिनेता परवीन डबास याचा शनिवारी, २१ सप्टेंबरला सकाळी गंभीर अपघात झाला आहे. त्याच्यावर मुंबईतील वांद्रे येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची पत्नी, मोहब्बतें फेम अभिनेत्री प्रीती झांगियानीने(Preeti Jhangiani) परवीनच्या प्रकृतीविषयी अपडेट दिली आहे. तिने सांगितले की, परवीनला डोक्याला दुखापत झाली आहे, आणि त्याला लवकरच आयसीयूमधून (अतिदक्षता विभागातून) बाहेर काढले जाण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परिवारासाठी भावनिक धक्का

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत प्रीतीने अपघाताचा परिवारावर झालेला भावनिक परिणाम झाला आहे असे सांगितले . “हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे, अजूनही आम्ही भावनिक धक्क्यात आहोत आणि त्यातून हळूहळू सावरण्याचा प्रयत्न करत आहोत. परवीन नेहमी खूप सक्रिय असतो, कामाबद्दल सतत बोलत असतो. त्याला शांत आणि निष्क्रिय अवस्थेत पाहणे आमच्यासाठी खूप त्रासदायक आहे,” असे ती म्हणाली.

हेही वाचा…बॉलीवूड अभिनेता परवीन डबासचा भीषण अपघात, डोक्याला गंभीर दुखापत, ICU मध्ये असल्याची पत्नीने दिली माहिती

परवीनच्या प्रकृतीची स्थिती

प्रीतीने परवीनच्या प्रकृतीविषयी आणखी माहिती दिली. तिने सांगितले, “त्याला चक्कर येत आहे, डोळ्यांसमोर दुहेरी चित्र (डबल व्हिजन) दिसत आहे, त्याला झोप येत आहे आणि मळमळ होत आहे. हे सर्व डोक्याला दुखापत झाल्याचे लक्षण आहेत. सध्या तो खूप बोलू शकत नाही. सुदैवाने, त्याचे एमआरआय आणि सीटी स्कॅनचे रिपोर्ट्स नॉर्मल आले आहेत. तो आणखी एक आठवडा हॉस्पिटलमध्ये राहील, आणि लवकरच आयसीयूमधून बाहेर येईल. आम्ही तीन दिवसांनी पुन्हा सीटी स्कॅन करणार आहोत.”

दारू पिऊन गाडी चालवण्याचे खोटे आरोप फेटाळले

मोहब्बतें फेम प्रीती झांगियानीने या अपघाताविषयी काही महत्त्वाचे खुलासेही केले. अपघाताच्या वेळी परवीन डबास दारूच्या नशेत नव्हता, असे स्पष्ट करून तिने अपघाताविषयीच्या अफवा फेटाळल्या. “तो दारू पिऊन गाडी चालवत नव्हता, हे आता पोलिसांच्या अहवालातही स्पष्ट झाले आहे. आम्ही टॉक्सिकॉलॉजी टेस्टही केली आहे. परवीन कधीही दारू पिऊन गाडी चालवत नाही आणि नियम मोडण्याच्या अगदी विरोधात आहे,” असे प्रीतीने सांगितले.

हेही वाचा…रणबीर कपूर लेक राहासाठी गातो चक्क मल्याळम अंगाई, तर आजी सोनी राजदान गातात ‘हे’ गाणं

परवीन डबासची ओळख

परवीन डबास त्याच्या ‘खोसला का घोसला’ या समीक्षकांनी कौतुक केलेल्या चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखला जातो. तो नुकताच ‘शर्माजी की बेटी’ या चित्रपटात आणि प्राइम व्हिडीओच्या ‘मेड इन हेवन’ या वेबसिरीजमध्ये दिसला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor parvin dabas road accident wife actress preeti jhangiani shares health update psg