ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट चार दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहून प्रेक्षक नाराज झाले आहेत. या चित्रपटावर सर्वत्र टीका केली जात आहे. प्रेक्षकांबरोबरच अनेक कलाकारांनीदेखील या चित्रपटाबाबत नाराजी व्यक्त केली. आता अशातच एका बॉलीवूड अभिनेत्याने या चित्रपटामुळे ओम राऊत करिअर संपलं, असं म्हटलं आहे.

‘आदिपुरुष’मध्ये दाखवलेली दृश्यं, या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय, चित्रपटातील संवाद, या चित्रपटाचे व्हीएफएक्स या सगळ्या वरच टीका केली जात आहे. हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात जास्त निराशाजनक चित्रपट आहे, असं अनेकजण म्हणत आहेत. अशातच आता अभिनेता, निर्माता, चित्रपट समीक्षक केआरके म्हणजेच कमाल आर खान याने केलेलं एक ट्वीट चर्चेत आलं आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Diljit Dosanjh invokes Rahat Indori poetry amid calls to cancel Indore concert
कॉन्सर्ट रद्द करण्यासाठी बजरंग दलाचे आंदोलन, दिलजीत दोसांझ म्हणाला, “किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है”

आणखी वाचा : फक्त एका मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन अन् नंतर थेट बॉलीवूडमध्ये झेप; जाणून घ्या ‘आदिपुरुष’चा दिग्दर्शक ओम राऊतबद्दल…

‘आदिपुरुष’ प्रदर्शित होण्यापूर्वी कमाल आर खान या चित्रपटाचं कौतुक करत होता. पण हा चित्रपट पाहिल्यावर त्याने यू-टर्न घेतला. आता तो ‘आदिपुरुष’वर टीका करत आहे. तर आता ओम राऊतला त्याने लक्ष केलं आहे. एक ट्वीट करत त्याने लिहिलं, “‘आदिपुरुष’ हा ओम राऊतच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट आहे. तर ‘बवाल’ हा चित्रपट नितेश तिवारी यांच्या करिअरचा शेवटचा चित्रपट आहे. दोघांचे अभिनंदन!” आता त्याचं हे ट्वीट चांगलंच चर्चेत आलं असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा : “मारुतीरायाचा आणि आपल्या रामाचा अपमान…,” देवदत्त नागेवर नेटकरी नाराज, म्हणाले, “तुम्हाला वाटलं नाही का की…”

दरम्यान, ‘आदिपुरुष’ या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत जगभरातून ३४० कोटींची कमाई केली. परंतु काल या चित्रपटाला खूप मोठा फटका बसला. पहिले तीन दिवस रोज ५० ते ६० कोटी कमावणाऱ्या या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने काल फक्त ९ ते १० कोटींचा गल्ला जमवला. त्यामुळे आता प्रेक्षक या चित्रपटाकडे पाठ फिरवत असल्याचं चित्र दिसत आहे.

Story img Loader