ए आर रेहमान आणि सायरा बानू यांनी २९ वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ते दोघे विभक्त होत असताना त्या प्रक्रियेत सहभागी असल्याचा दावा करणाऱ्या वंदना शाह यांनी विविध मुलाखतींमध्ये या विषयावर भाष्य केले. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी अभिनेता आर. माधवनला विवाह टिकणार नाही अशी शक्यता लक्षात घेऊन किंवा अशा परिस्थितीत जोडप्यांनी कुठल्या आर्थिक गोष्टी विचारात घ्याव्यात हा प्रश्न विचारला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याच संभाषणादरम्यान माधवनने सांगितले की, आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्याची पत्नी सरिता थोडी असुरक्षित होती. परंतु, काही आर्थिक निर्णयांमुळे त्यांच्या नात्यात स्थिरता आली आणि त्यांचे २५ वर्षांचे सुखी वैवाहिक जीवन सुरू राहिले.

हेही वाचा…“त्या दिग्दर्शकाने मला ऑफिसमध्ये बोलावलं आणि…”, राजकुमार रावच्या पत्नीने सांगितला ‘तो’ अनुभव

आर्थिक व्यवस्थापनाबद्दल यूट्यूब चॅनेल For A Change वर बोलताना माधवन म्हणाला, “मी अभिनेता होतो, माझ्या सुरुवातीच्या काळात मला चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जात असे आणि मुली माझ्यावर फिदा होत्या. सहाजिकच, यामुळे स्त्रीच्या मनात असुरक्षितता निर्माण होऊ शकते. अशी असुरक्षितता निर्माण होणे विवाहाला अस्थिर करण्यासाठी पुरेसे असते. मी माझ्या पालकांना विचारायचो की त्यांनी काय केलं? ते म्हणायचे, ‘आम्ही आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे गोष्टी बिघडणार असं गृहीत न धरता, त्या योग्य होतील असं गृहीत धरलं.’ त्यांनी नेहमीच सर्व गोष्टींसाठी एकत्रित बँक खाते ठेवलं होतं. मला ही खूप चांगली कल्पना वाटली.”

माधवन पुढे म्हणाला, “जर सरिताला तिच्या बँक खात्याकडे पाहताना असुरक्षित वाटणार असेल, तर आम्ही एकत्र बँक खाते तयार करू आणि म्हणू, ‘हे आमचं संयुक्त खाते आहे, हे दोघांचं आहे आणि त्यावर तुझीही तितकीच हक्काची सही असेल जितकी माझी आहे.’ मी असं गृहीत धरतो की हा विवाह टिकणार आहे आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवतो आणि मी आशा करतो की तूही माझ्यावर विश्वास ठेवशील.” या आर्थिक दृष्टिकोनामुळे त्यांचे नाते आणखी मजबूत झाले, असेही माधवनने सांगितले.

हेही वाचा…जान्हवी कपूर मासिक पाळीदरम्यान प्रत्येक महिन्याला बॉयफ्रेंडबरोबर करायची ब्रेकअप; म्हणाली, “एकदा माझं…”

माधवन पुढे म्हणाला, “माझं किती उत्पन्न आहे याबद्दल मला कधीच शंका आली नाही. माझी पत्नी माझ्या आर्थिक बाबी सांभाळते. खरं तर आजपर्यंत आम्ही घेतलेल्या सर्व गाड्या आणि मालमत्ता आम्ही एकत्रित नावावर घेतल्या आहेत.” पुढे बोलताना माधवनने हसत सांगितले, “मी त्या लोकांपैकी आहे, जे क्रेडिट कार्डवर जगतात, कारण माझी सगळी आर्थिक रक्कम माझ्या पत्नीच्या ताब्यात असते.”

असं जुळलं माधवन आणि सरिताचं लग्न

अभिनेता होण्यापूर्वी आर. माधवन हा पब्लिक स्पीकिंग कोच होता. त्याचदरम्यान त्याची भेट सरिताशी झाली. सरिता तेव्हा एअर होस्टेस होण्यासाठी प्रशिक्षण घेत होती. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत माधवनने सांगितले की, “सरिताला मी प्रशिक्षण दिले, त्यानंतर तिला पहिली नोकरी लागली, यासाठी मला धन्यवाद म्हणण्यासाठी तिने मला डिनरला आमंत्रित केलं होतं; त्याच क्षणापासून आमच्या प्रेमाचा प्रवास सुरू झाला.”

हेही वाचा…पहिल्या सिनेमानंतर ‘या’ अभिनेत्रीकडे नव्हतं दोन वर्षं काम, वडापाववर काढले दिवस; लोकल ट्रेनने केला प्रवास, खुलासा करत म्हणाली…

आठ वर्षांच्या डेटिंगनंतर, १९९९ मध्ये त्यांनी पारंपरिक तमिळ पद्धतीने विवाह केला. २००० मध्ये माधवनला मणिरत्नमच्या ‘अलाई पायुथे’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट लोकप्रिय ठरला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor r madhavan shares how he sustained 25 years of married life psg