बॉलीवूड अभिनेता आर माधवनने ‘३ इ़डियट्स’, ‘रहेना है तेरे दिल में’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेता त्याच्या चित्रपटांबरोबर वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. आर माधवन अलीकडेच पॅरिसमधील ‘बॅस्टिल डे’ कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन उपस्थित होते. माधवनने या दोन्ही दिग्गजांबरोबर सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : काजोलने करिअरमध्ये पहिल्यांदाच मोडली ‘नो-किसिंग पॉलिसी’; व्हायरल लिपलॉक सीनवर उत्तर देत म्हणाली, “लोक माझ्याबद्दल…”

आर माधवनने शेअर केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. तर काही जणांना हा कार्यक्रम नेमका काय होता? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्यावर असताना त्यांच्या सन्मानासाठी लूव्रे म्युझियम येथे खास जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अभिनेता आर माधवन सहभागी झाला होता.

हेही वाचा : केदार शिंदे यांची वंदना गुप्ते यांच्या वाढदिवसानिमित्त हटके पोस्ट; डॅशिंग फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

आर माधवनला या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले होते. त्याने या संपूर्ण कार्यक्रमातील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर करत अभिनेता लिहितो, “१४ जुलै २०२३ रोजी मी पॅरिसमध्ये संपन्न झालेल्या ‘बॅस्टिल डे’ सेलिब्रेशनमध्ये सहभागी झालो होता. यामुळे भारत आणि फ्रान्स या देशातील संबंध अधिक घट्ट झाले. उपस्थित प्रत्येकाला एकमेकांप्रती प्रचंड आदर होता. राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आमच्याबरोबर सेल्फी सुद्धा काढला. तो क्षण माझ्या कायम लक्षात राहिल. फ्रान्स आणि भारत संबंध असेच समृद्ध होत राहोत.” तसेच हे फोटो शेअर करत आर माधवनने ‘चांद्रयान ३’ मिशनसाठीही प्रार्थना केली आहे.

हेही वाचा : शाहरुखने भेट म्हणून दिलेल्या लॅपटॉपला आमिर खानने पाच वर्षं हातही लावला नव्हता; अभिनेत्याने सांगितलं कारण

आर माधवनने या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन या दोघांचेही आभार मानले आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोवर सध्या नेटकरी लाइक्स आणि कौतुकाचा वर्षाव करत आहेत. या फोटोवर अभिनेत्री शिल्पा शेट्टीने “मला तुझा खूप अभिनेता वाटतोय” अशी कमेंट केली आहे. तसेच फोटोंवर प्रतिक्रिया देत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी “जय हो, जय हिंद” असे म्हटले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor r madhavan shares picture with pm modi and french president emmanuel macron sva 00