Rajpal Yadav property seized: बॉलीवूड अभिनेता राजपाल यादवबद्दल मोठी बातमी समोर आली आली. बँकेने राजपाल यादवची कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. राजपालने बँकेकडून कर्ज घेतलं होतं, पण तो ते कर्ज फेडू शकला नाही, त्यामुळे बँकेने अभिनेत्याविरोधात मोठी कारवाई केली. त्याची ही संपत्ती उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमधील सेठ एन्क्लेव्हमध्ये आहे.

राजपाल यादवची कोट्यवधींची मालमत्ता बँकेने जप्त केली आहे. हे प्रकरण २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या अभिनेत्याच्या ‘अता पता लपता’ या चित्रपटाशी संबंधित आहे. हा चित्रपट राजपालने दिग्दर्शित केला होता तर त्याची पत्नी राधा यादव निर्माती होती. या चित्रपटासाठी राजपालने सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबईच्या वांद्रे शाखेतून पाच कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. १२ वर्ष होऊनही राजपाल कर्जाची परतफेड करू शकत नसल्याने बँकेने शाहजहांपूरमधील सेठ एन्क्लेव्हमध्ये असलेली त्याची कोट्यवधींची मालमत्ता जप्त केली आहे. ‘भास्कर’ने हे वृत्त दिलं आहे.

Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचा मुख्यमंत्रिपदाबाबत काय निर्णय झालाय? शरद पवार सस्पेन्स मिटवत म्हणाले…
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
Abhishek Lodha transferred 18 percent stake in the company to a charitable trust print eco news
आता लोढादेखील टाटांच्या दानकर्माच्या वाटेवर; धर्मादाय न्यासाला कंपनीतील १८ टक्के हिस्सा हस्तांतरित
Tata Motors profit falls 11 percent as vehicle sales decline
वाहनांची विक्री घसरल्याने टाटा मोटर्सच्या नफ्यात ११ टक्के घट;  दुसऱ्या तिमाहीत ३,३४३ कोटी रुपयांवर
Vijay Wadettiwar, Bramhapuri Vijay Wadettiwar,
विजय वडेट्टीवार यांचा उमेदवारी अर्ज अवैध? उच्च न्यायालय म्हणाले…

“माझ्यावर १.२ कोटींचे कर्ज…”, अभिनेता गुरुचरण सिंग आर्थिक अडचणीत; ३४ दिवसांपासून अन्न नाही, कामही मिळेना

सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे मुंबईतील अधिकारी दोन दिवसांपूर्वी शाहजहांपूरला गेले होते. त्यानंतर राजपालच्या प्रॉपर्टीवर बँकेचे बॅनर लावण्यात आले होते. ही मालमत्ता सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबईची असून त्याची कोणत्याही प्रकारची खरेदी-विक्री करू नये, असं त्या बॅनरवर लिहिलं होतं. सोमवारी सकाळी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुंबईच्या अधिकाऱ्यांनी ही मालमत्ता जप्त केली.

rajpal yadav
अभिनेता राजपाल यादव (फोटो – इन्स्टाग्राम)

अभिषेक बच्चनने खरंच ऐश्वर्या रायपासून घटस्फोट घेण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिलीय? ‘त्या’ व्हायरल विधानामागचं सत्य काय?

राजपाल यादवने हे कर्ज त्याचे वडील नौरंगी लाल यादव यांच्या नावावर घेतले होते. तो हे कर्ज फेडू शकला नाही, त्यामुळे बँकेने त्याच्यावर मोठी कारवाई केली आहे. सध्या राजपाल यादवने या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

तृप्ती डिमरीचा सुपरफ्लॉप चित्रपट सहा वर्षांनी पुन्हा प्रदर्शित, दोन दिवसांत कमावले…

राजपाल यादवला भोगावा लागलेला तीन महिन्यांचा तुरुंगवास

याआधी २०१८ मध्ये अशाच एका प्रकरणात राजपालला तीन महिने तुरुंगात जावं लागलं होतं. दिल्लीस्थित कंपनी मुरली प्रोजेक्ट्सने राजपाल यादव याच्या श्री नौरंग गोदावरी एंटरटेनमेंट या कंपनीविरुद्ध दिवाणी खटला दाखल केला होता. त्यांच्याकडून राजपालने २०१० मध्ये कर्ज घेतलं होतं, ते कर्ज फेडू न शकल्याने त्याला तीन महिन्यांचा तुरुंगवास झाला होता.