लाहोरमध्ये अंडरवर्ल्ड डॉन आमीर सरफराजची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. आमीर सरफराज हा तोच डॉन होता ज्याने पाकिस्तानच्या तुरुंगात बंदी असलेले सामान्य नागरिक सरबजीत यांची हत्या केली होती. आता या डॉनची हत्या करण्यात आली आहे. ज्यानंतर रणदीप हुड्डाने एक पोस्ट शेअर करत अज्ञात मारेकऱ्यांचे आभार मानले आहेत. रणदीप हुड्डाची ही पोस्ट चर्चेत आहे कारण त्याने सरबजीत यांच्यावर आधारित सिनेमात सरबजीत ही भूमिका साकारली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे रणदीप हुड्डाने?

रणदीपने पोस्ट करत म्हटलं आहे, “तुम्ही जे कर्म करता ते तुमच्याकडे नक्की परततं. अज्ञात मारेकऱ्यांचे आज मी आभार मानतो आहे. मला आज माझी बहीण दलबीर कौरची आठवण येते आहे. पूनम आणि स्वप्नदीप यांचीही आठवण येते आहे. सरबजीतला किमान इतका तरी न्याय मिळाला.” अशी पोस्ट रणदीप हुड्डाने केली आहे.

सरबजीत यांची हत्या कशी झाली?

पाकिस्तानच्या कोट लखपत तुरुंगात आमीर सरफराजने सरबजीतची हत्या पॉलिथीन बॅगने गळा आवळून केली होती. तसंच त्याने सरबजीत यांना खूप मारहाणही केली होती. पाकिस्तानची दहशतवादी संघटना आयएसआयच्या इशाऱ्यावर सरफराजने सरबजीत यांना तडफडवून मारलं होतं. सरबजीत यांना पाकिस्तानची हेरगिरीच्या आरोपांवरुन अटक करण्यात आली होती. पाकिस्तानी लष्कराने त्यांना अटक केली होती. सरबजीत सिंग हे भारत पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या भिखीविंड गावातले शेतकरी होते. ३० ऑगस्ट १९९० या दिवशी त्यांनी चुकून पाकिस्तानच्या सीमेत प्रवेश केला. तिथे त्यांना पाकिस्तानी लष्कराने अटक केली. त्यानंतर त्यांना लाहोर आणि फैसलबाद येथील बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी बनवण्यात आलं आणि तुरुंगात डांबण्यात आलं.

हे पण वाचा- रणदीप हुड्डाने ज्यासाठी मालमत्ता विकली, त्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाचं मूळ बजेट किती? जाणून घ्या

रणदीप हुड्डाने केला होता सिनेमा

सरबजीत यांच्या आयुष्यावर रणदीप हुड्डाने सरबजीत या नावाचा सिनेमाही केला होता. त्या सिनेमासाठी रणदीपने २८ किलो वजन कमी केलं होतं. या सिनेमात सरबजीत सिंग यांच्या बहिणीची भूमिका ऐश्वर्या रायने साकारली होती. सध्या रणदीप हुड्डा वीर सावरकर सिनेमामुळे चर्चेत आहे. अशात त्याची पोस्टही चर्चेत आली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor randeep hooda thanks unknown men after sarabjit singh killer shot dead scj