बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी म्हणून अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंगला ओळखले जाते. दीपिका-रणवीरची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेते असते. त्या दोघांनीही मुंबईपासून जवळ असलेल्या अलिबागमध्ये दोन बंगले खरेदी केले आहेत. काही दिवसांपूर्वी या नव्या घराची गृहप्रवेशाची पूजा पार पडली होती. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर गृहप्रवेशाचे काही फोटो पोस्ट केले होते. नुकतंच एका मुलाखतीत रणवीरने त्यांच्या या घराबद्दल खुलासा केला आहे.
रणवीर सिंग हा सध्या त्याचा आगामी सर्कस या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने रणवीर सिंगने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या अलिबागच्या घराबद्दल अनेक खुलासे केले आहेत. “दीपिका पदुकोण ही खूप गोंडस आहे. ती एखाद्या लहान बाहुलीसारखी घरात वावरत असते. आम्हा दोघांनाही नव्या घरात एकत्र वेळ घालवायला आवडते. दीपिका आणि मी नुकतेच आमचे पहिले घर एकत्र खरेदी केले आहे. सध्या आम्ही त्या घरात इंटेरिअर करत आहोत.”
आणखी वाचा : पहिली भेट, फ्लर्ट, गुपचूप साखरपुडा; दीपिका-रणवीरची Untold ‘लव्ह स्टोरी’
“मी आणि दीपिकाने लग्नानंतर चार वर्षांनी एकत्र घर खरेदी केले आहे. आम्ही दोघंही कामात व्यस्त असतो. आम्ही शूटींगच्या निमित्ताने बाहेर असतो. पण तिला घरात राहणे फार आवडते. त्यामुळे आम्ही जास्त बाहेर जात नाही. अनेकदा आम्ही घरीच एकमेकांबरोबर वेळ घालवणे पसंत करतो.
त्यामुळेच आम्ही शहराच्या बाहेर घर खरेदी केले आहे. तिथे शांतता आहे. तिकडे आम्हाला एकांत मिळतो. विशेष म्हणजे एकमेकांबरोबर क्वॉलिटी टाईम घालवण्यासाठी हे खरोखरच योग्य ठिकाण आहे. विशेष म्हणजे दीपिकाने हे घर अगदी मनापासून सजवले आहे. याचा मला फार अभिमान आहे. ती नेहमी लहान मुलांप्रमाणे गोष्टी करण्यात फार उत्सुक असते आणि मला तिला प्रोत्साहन द्यायला आवडते. ती एक उत्तम इंटीरिअर डेकोरेटर आहे. मी अनेकदा तिला बाहुलीच्या रुपात घरात राहणारी लहान मुलगी म्हणून चिडवत असतो. पण तिला अनेकदा गृहिणी म्हणून राहणे आवडते. मला ती खूप गोंडस वाटते. त्यामुळेच मी माझ्या पत्नीसोबत घरी चांगला वेळ घालवत असतो”, असे रणवीरने सांगितले.
आणखी वाचा : “मी आणि रणवीर…” वैवाहिक आयुष्याबद्दल दीपिका पदुकोणने सोडलं मौन
दरम्यान रणवीर आणि दीपिकाने मुंबईपासून जवळ असलेल्या अलिबागमध्ये दोन बंगले खरेदी केले आहेत. अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे त्यांनी ९० गुंठे जागा खरेदी केली होती. याची किंमत साधारण २२ कोटींच्या घरात आहे. या दोघांनी काही दिवसांपूर्वी पारंपरिक पद्धतीने सर्व पूजाविधी पार पाडल्या होत्या.