अभिनेता रितेश देशमुख अगदी परफेक्ट फॅमिली मॅन आहे. रितेश त्याचे वडील म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या खूप जवळ होता. आजही वडिलांच्या आठवणीने तो भावूक होतो. सोशल मीडिद्वारे वडिलांसाठी खास पोस्ट शेअर करतानाही दिसतो. लोकांचं आपल्या वडिलांवर असणारं प्रेम पाहून रितेशला त्यांचा अभिमान वाटतो. आताही रितेशने एक वडिलांचा एक फोटो ट्वीट केला आहे.
आणखी वाचा – Video : चुकी कोणाची? अर्चना गौतमने गळा दाबल्यानंतर सलमान खान मराठमोळ्या शिव ठाकरेवरच संतापला
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेची गेले काही दिवस चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रभरातून भारत जोडो यात्रेला लोकांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यादरम्यानचाच एक फोटो रितेशने ट्वीट केला.
या फोटोमध्ये एक व्यक्ती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा फोटो घेऊन चालताना दिसत आहे. हे पाहून रितेशला अभिमान वाटला. त्याने भावूक होत चक्क हा फोटो ट्वीट केला आहे. रितेशने हा फोटो ट्वीट केल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.
आणखी वाचा – जया बच्चन यांना वाटायची मासिक पाळीची लाज, म्हणाल्या, “चित्रीकरणादरम्यान बस किंवा झाडामागे जाऊन…”
तुम्ही भारत जोडो यात्रामध्ये कधी सहभागी होणार?, तुम्ही या यात्रेमध्ये दिसत नाही, तुम्हीही भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी व्हा असं अनेकांनी कमेंटच्या माध्यमातून म्हटलं आहे. तर अनेकांनी विलासराव देशमुख तुमची नेहमीच आठवणीत असणार असं म्हटलं आहे.