बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलीया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. २०१२ मध्ये लग्नगाठ बांधलेल्या या जोडीचं एकमेकांवर अतोनात प्रेम आहे. रितेश आणि जिनिलीयाला रियान आणि राहील अशी दोन मुलं आहेत. रितेशने नुकतंच त्यांच्या मुलांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रितेशने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. रितेशच्या दोन्हीही मुलांनी रविवारी एक फुटबॉलची स्पर्धा जिंकली. त्यावेळी त्यांना प्रमाणपत्र आणि मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर त्यांनी घरी येऊन काय केलं, याचा एक व्हिडीओ रितेशने पोस्ट केला आहे.
आणखी वाचा : “मी नाही म्हणायला हवं होतं पण…” माधुरी दीक्षितने विनोद खन्नांबरोबरच्या ‘त्या’ किसिंग सीनबद्दल केलेला खुलासा, म्हणालेली “यानंतर मात्र…” 

रितेशने पोस्ट केलेल्या व्हिडीओत त्याचा मोठा मुलगा रियान हा चालत आजीकडे जाताना दिसत आहे. त्यावेळी तो आजीला मिठी मारतो आणि गळ्यातील मेडल काढून तिच्या गळ्यात घालतो. त्यावेळी त्याची आजी ही रियानला शुभेच्छा देत हात मिळवताना दिसत आहे.

त्यानंतर राहीलही आजीच्या गळ्यात मेडल घालतो आणि हातात प्रमाणपत्र देतो. रितेशने या व्हिडीओला हटके कॅप्शन दिले आहे. “रियान आणि राहिल या दोघांनीही फुटबॉल स्पर्धेत जिंकलेले मेडल्स मदर्स डे निमित्ताने आजीला दिले आहेत. आयुष्यातील काही क्षण अनमोल असतात. तुमच्या पालकांबरोबर वेळ घालवा. मुलांबरोबर वेळ घालवा”, असे कॅप्शन रितेशने दिले आहे.

रितेश देशमुखच्या पोस्टवर कमेंट

आणखी वाचा : “माझे बाबा मला सोडून गेले तेव्हा…” सखी गोखलेने सांगितला ‘तो’ भावूक अनुभव, म्हणाली “मी आजही…”

रितेशच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. “याला संस्कार म्हणतात, बाळांनो खुप मोठ्ठे व्हा”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. “मोठ्यांचा मानं ठेवणं त्यांना आदर देणं हीचं तर महाराष्ट्राची,मराठवाड्याची संस्कृती आहे..रितेश दादा तुला आणि आईसाहेबांना जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!” अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने “खूप छान संस्कार”, असे म्हटले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor riteish deshmukh genelia son win gold medal give to grandmother see video netizen appreciate nrp