अभिनेता रितेश देशमुख सध्या ‘रेड २’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. अजय देवगणच्या ‘रेड २’ चित्रपटात रितेश खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे आता रितेशचे चाहते त्याला पुन्हा खलनायकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अशातच सोशल मीडियावरील रितेशच्या एका व्हिडीओने लक्ष वेधून घेतलं आहे; ज्यात अभिनेता पापाराझींवर वैतागलेला पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता रितेश देशमुखचा हा व्हायरल व्हिडीओ Voompla या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये रितेश पत्नी जिनिलीया देशमुखबरोबर पाहायला मिळत आहे. पण यावेळी रितेश पापाराझींवर वैतागल्याचं दिसत आहे.

हेही वाचा – शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांच्या निधनावर मधुराणी प्रभुलकरने व्यक्त केला शोक, म्हणाली, “अशा कशा अचानक विलीन झालात?”

रितेशचा व जिनिलीयाचा हा व्हिडीओ त्यांच्या मुलांच्या फुटबॉल सरावादरम्यानचा आहे. या व्हिडीओत, फुटबॉल सरावादरम्यान पापाराझी रितेश व जिनिलीया स्पॉट करतात. तेव्हा रितेश वैतागून म्हणतो, “मुलांच्या फुटबॉलमध्ये कुठे येता तुम्ही? लहान मुलांना तरी सोडा.” यानंतर रितेश व जिनिलीया पापाराझींना पोज देताना पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – “हे मृगजळ आहे”, तेजश्री प्रधानने सांगितलं यश म्हणजे काय? सल्ला देत म्हणाली…

दरम्यान, रितेश देशमुखचा ‘रेड २’ १५ नोव्हेंबर २०२४ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रितेशसह अजय देवगण, वाणी कपूर झळकणार आहे. याआधी रितेशने ‘एक विलेन’, ‘मरजावा’ या चित्रपटात खलनायक साकारला होता. आता तो ‘रेड २’ चित्रपटातून पुन्हा एकदा खलनायकाच्या रुपात पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor riteish deshmukh is upset seeing the paparazzi video viral pps