Bollywood Actor Saif Ali Khan Attacked With Sharp Weapon At Home: अभिनेता सैफ अली खान दरोडेखोराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. आज (गुरुवार, १६ जानेवारी) मध्यरात्री सैफच्या मुंबईतील वांद्रे (पश्चिम) येथील घरात एक दरोडेखोर घुसला होता. त्याच्याबरोबर झालेल्या झटापटीत सैफला दुखापत झाली आहे. या घटनेबाबत सैफ अली खानच्या वतीने त्याच्या टीमने अधिकृत निवेदन दिलं आहे.

अभिनेता सैफ अली खानच्या टीमने अभिनेत्यावर मुंबईत त्याच्या घरी झालेल्या हल्ल्याबद्दल अधिकृत निवेदन जारी केलं आहे. “सैफ अली खानच्या घरी निवासस्थानी दरोड्याचा प्रयत्न झाला होता. तो सध्या रुग्णालयात असून शस्त्रक्रिया सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत,” असं निवेदनात म्हटलं आहे.

shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Sanjay Raut Answer to Amit Shah
Sanjay Raut : संजय राऊत यांचं अमित शाह यांना उत्तर, “उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आणि…”
Shashi Tharoor on Nitesh Rane
नितेश राणेंच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून शशी थरूर यांचा संताप; म्हणाले, “या लोकांना…”
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी खरं सांगत नसतील तर त्यांना…”, बजरंग सोनावणेंचं वक्तव्य
Junaid Khan And Reena Dutta
आमिर खानच्या मुलाला होता ‘हा’ आजार; ‘तारे जमीन पर’ची स्क्रीप्ट ऐकल्यानंतर झालेली जाणीव, जुनैद खानचा खुलासा
anjali Damania
Anjali Damaniya : “मला रोज ७००-८०० फोन, माझ्यावर अश्लील कमेंट्स”, धनंजय आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांवर अंजली दमानियांचा आरोप!
loksatta editorial on Islamic terrorism
अग्रलेख : खरोखरच खतरे में…

हेही वाचा – “त्याच्या गृहसेविकेबरोबर वाद…”, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांची पहिली प्रतिक्रिया

हेही वाचा – मोठी बातमी! अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, वांद्रेतील घरात मध्यरात्री घडली घटना

सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. गुरुवारी रात्री अभिनेता सैफ अली खानच्या घरात एक अज्ञात माणूस घुसला, त्याने त्याच्या घरात काम करणाऱ्या गृहसेविकेबरोबर वाद घातला. नंतर सैफने हस्तक्षेप करून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने सैफवर हल्ला केला. या घटनेत सैफ जखमी झाला आहे, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

हेही वाचा – Attack on Saif Ali Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाल्या…

सैफ अली खान या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. त्याला पहाटे लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सैफच्या मानेला व मणक्याला जखमा झाल्या आहेत. “सैफवर त्याच्या घरात अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. त्याला पहाटे साडेतीन वाजता लीलावती रुग्णालयात आणण्यात आलं. त्याला सहा जखमा झाल्या आहेत, त्यापैकी दोन जखमा खोल आहेत. एक जखम त्याच्या मणक्याजवळ झाली आहे. आम्ही त्याच्यावर शस्त्रक्रिया करत आहोत,” असं लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ निरज उत्तमानी म्हणाले.

Story img Loader