अभिनेता सलमान खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. सलमानचा बहुचर्चिच चित्रपट ‘टायगर ३’ लवरकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “मला तुमच्यासारख्या लोकांमुळे…”, डीपफेक व्हिडीओ प्रकरणी पाठिंबा देणाऱ्या अमिताभ बच्चन यांचे रश्मिकाने मानले आभार

दरम्यान, ‘टायगर ३’साठी सलमान खानने किती मानधन घेतले याबाबतची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार- ‘टायगर ३’साठी सलमानने १०० कोटी रुपये मानधन घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटाच्या नफ्यातील ६० टक्के वाटा सलमान खान घेणार आहे. या नफ्याची किंमत जवळपास १०० कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. मात्र, चित्रपटाच्या नफ्यानुसार सलमान खानची फी वाढू किंवा कमीही होऊ शकते.

‘टायगर ३’ च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला जबरदस्त प्रतिसाद

भारतात ‘टायगर ३’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला ५ नोव्हेंबर २०२३ पासून सुरुवात झाली. अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यापासून २४ तासांमध्ये ‘टायगर ३’ची सुमारे एक लाख ४० हजार तिकिटे विकली गेली होती. अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून चित्रपटाने ४.२ कोटी रुपयांची कमाई केली होती. अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या कमाईचे हे आकडे पाहता, ३०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई करील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा- ‘डॉन ३’मध्ये ‘जंगली बिल्ली’ म्हणून पुन्हा झळकणार प्रियांका चोप्रा; लवकरच होणार चित्रीकरणाला सुरुवात

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे १२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘टायगर’ व ‘टायगर जिंदा है’प्रमाणेच या चित्रपटातही सलमान आणि कतरिनाचा अॅक्शन अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सलमान, कतरिनाबरोबरच इमरान हाश्मीचीही मुख्य भूमिका आहे. इमरानने या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली आहे. ‘टायगर ३’मध्ये सलमान आणि कतरिनाबरोबर इमरानचेही अॅक्शन सीन्स बघायला मिळाणार आहेत. मनीष शर्मा दिग्दर्शित ‘टायगर ३’ हिंदीबरोबरच तमीळ व तेलुगु भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor salman khan fees for tiger 3 know the details dpj