मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता संतोष जुवेकरने अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. संतोष नेहमीच वैविध्यपूर्ण कलाकृतींमध्ये झळकतो. तर आता लवकरच तो विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या ‘छावा’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. त्या संबंधित त्याने शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हाय का ऐतिहासिक चित्रपट असून या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर करत आहेत. या चित्रपटासाठी संतोष खूप मेहनत घेत आहे. नुकताच त्याने त्याचा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तो तलवारबाजीचा सराव करताना दिसत आहे. तर हा व्हिडीओ शेअर करत त्याखाली त्याने लिहिलेली कॅप्शन आता चर्चेत आली आहे.

Man Kill father murderer after 22 Years
बदला पुरा! वडिलांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी २२ वर्ष वाट पाहिली, मोठा होताच त्याचपद्धतीने केली मारेकऱ्याची हत्या
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Girls' Stunning dance on Mahabharat tital song
‘महाभारत’च्या टायटल गाण्यावर थिरकल्या मुली, डान्स स्टेप्स अन् चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा
Bengaluru Mahalaxmi Murder Updates in Marathi
Mahalakshmi Murder Case : “महालक्ष्मीवर प्रेम होतं, पण तिने मला…”, बॉयफ्रेंडच्या सुसाइड नोटमध्ये काय लिहिलंय?
Instagram Love Affair Case
‘तो ‘इन्स्टा’वरच छान दिसत होता’, मुलीने मुलाला नाकारलं; चिडलेल्या मुलानं मग ‘तिचा’ तसला व्हिडीओ केला व्हायरल
IND vs BAN Rohit Sharma Hits Shubman Gill on His Jaw Video Viral
VIDEO: रोहितने बोलता बोलता मुद्दाम शुबमनला मारलं, विराटने कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होतंय सांगताच कॅप्टनने पाहा काय केलं?
BAPS Swaminarayan Temple
न्यूयॉर्कमध्ये स्वामीनारायण मंदिराची तोडफोड; भिंतींवर लिहिल्या भारतविरोधी घोषणा, भारतीय दुतावासाने नोंदवला तीव्र निषेध
a boy can not swim but jumped into the well as a friend said
पोहता येत नव्हते पण मित्र म्हणाला म्हणून विहिरीत उडी मारली; चिमुकल्याचा मैत्रीवरचा विश्वास, VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’ पाठोपाठ ‘अफलातून’ही सुपरहिट, सिद्धार्थ जाधव-जॉनी लिवर यांच्या चित्रपटाने दोन दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

तलवारबाजीचा सराव करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट करत संतोषने लिहिलं, “तालमीला सुरवात केली आणि पुढच्या २० मिनटात दमून घामाच्या धारा सुरु झाल्या, तेही लाकडाची तलवार आणि अगदीच तालमीसाठी वापरायची ढाल घेऊन. तेव्हा खरंच पुन्हा एकदा जाणीव झाली ती चार ते पाच किलोची तलवार आणि ती ढाल घेऊन माझे मावळे दिवस भर अगदी सूर्यास्तापर्यंत न थांबता तेवढ्याच ताकदीने कसे लढले असतील. नुसता विचार केला तरी थरकाप उडतो ओ. आज जेव्हा तालमीला जातो तेव्हा ती लाकडी तलवार हातात घेतल्यावर जे काही वाटत असेल ते नाही शब्दात सांगू शकत. ते अनुभवायलाच हवं.”

आणखी वाचा : अभिनेता संतोष जुवेकरने ‘ही’ गोष्ट घेतलीये मनावर; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “सावत्या लेका भारी आहेस रे तू…”

पुढे त्याने लिहिलं, “आपल्या राजाच्या आदेशावरून त्याच्यावर जीव ओवाळून टाकण्यात आणि निधढ्या छातीनं आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी लढण्यात जी नशा आणि जी ताकद होती ती माझ्या त्या शिवरायांच्या मावळ्यालाच ठाऊक. धन्य ती जिजाऊ धन्य ते शिवराय आणि धन्य तो माझा प्रत्येक मर्द मराठा मावळा. त्रिवार मुजरा समद्यास्नी. ह्या माझ्या मावळ्यांच्या आशीर्वादानेच ह्या माझ्या मावळ्यांच्या चरणी एक पुष्प अर्पण करण्याचा प्रयत्न करतोय. आशिर्वाद आणि साथ असूदेरे महाराजा.” तर आता संतोषच्या या पोस्टवर कमेंट करत त्याची ही पोस्ट आवडल्याचं नेटकरी सांगत आहेत.