ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांनी अलीकडेच ब्रिटनमध्ये वर्णद्वेषी टिप्पणीचा सामना करावा लागला. त्यांनी हिथ्रो विमानतळावरील त्यांचा वर्णभेदाचा अनुभव शेअर केला आहे. ट्विटरवरून त्यांनी त्यांच्याबरोबर घडलेला प्रकार शेअर केला. सतीश शाह सारखे लोक फर्स्ट क्लास तिकीट कसं घेऊ शकतात? असंही तिथल्या स्टाफने म्हटलं आणि ते सतीश यांच्याकडे पाहून हसू लागले होते.
सतीश शाह यांनी ट्विटरवरून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी ट्वीट करून त्या टिप्पणीवर प्रत्युत्तर दिलं. त्यांनी लिहिलं, “मी हसलो आणि म्हणालो, ‘कारण मी भारतीय आहे’. मग ते गप्पच बसले. मी फर्स्ट क्लासमद्ये प्रवास करतोय, हे पाहून हिथ्रोचे कर्मचारी चकित झाले होते. एक जण माझ्या समोर त्याच्या सोबतच्या स्टाफला विचारू लागला की ह्या लोकांना फर्स्ट क्लास तिकीट परवडतं का? त्यावर मी हे उत्तर दिले”.
दरम्यान, ‘आपण भारतीय आहोत, हे उत्तरच अशा लोकांसाठी पुरेसं आहे.’ ‘ब्रिटिशांनी २०० वर्ष आमचा देश लुटल्यानंतरही आमच्याकडे पैसा आणि आम्ही महाग तिकीटं घेऊ शकतो, असं उत्तर तुम्ही द्यायला हवं होतं,’ ‘तुम्ही दिलेलं उत्तर एकदम योग्य आहे’, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
सतीश शाह यांनी अनेक हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलंय. ‘मैं हूं ना’, ‘ओम शांती ओम’ आणि ‘रा वन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केलाय. तसेच ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ मालिकेतील इंद्रवदन साराभाई या भूमिकेसाठी ते विशेष ओळखले जातात.