बॉलीवूडचा सुपस्टार म्हणून शाहरुख खानला ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर शाहरुखने बॉलीवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. २०२३ वर्ष शाहरुखसाठी खूप चांगलं गेलं. त्याच्या ‘पठाण ‘आणि ‘जवान’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. उद्या २ नोव्हेंबरला शाहरुख खान आपला ५८ वा वाढदिवस साजरा आहे. या वाढदिवसानिमित्त खास पार्टीचे आयोजन करण्यात आलं आहे. तसेच शाहरुखच्या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना खास सरप्राईज मिळणार आहे.

हेही वाचा- Video : श्रद्धा कपूरसमोर तुटली पापाराझीच्या महागड्या कॅमेऱ्याची लेन्स, पुढे अभिनेत्रीने दिलेलं आश्वासन ऐकून नेटकरी झाले थक्क

vivek oberoi reveals why he rejected om shanti om film
विवेक ओबेरॉयचा १७ वर्षांनी खुलासा; शाहरुखचा ‘ओम शांती ओम’ सिनेमा का नाकारला? म्हणाला, ” तेव्हा ४ ते ५ महिने…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
abhijeet bhattacharya shah rukh khan
शाहरुख खानला ‘या’ नावाने चिडवायचे इतर अभिनेते, अभिजीत भट्टाचार्य यांनी केला खुलासा; म्हणाले, “दुबईतील पुरस्कार सोहळ्यात…”
Raghunath Mashelkar statement regarding Shri Morya Gosavi Maharaj Lifetime Achievement Award Pune news
श्री मोरया गोसावी महाराज जीवन गौरव पुरस्कार म्हणजे श्री गणेशाचा आशीर्वाद – डॉ. रघुनाथ माशेलकर
Shah Rukh Khan Emotional On Swades Act
Video : लेकाच्या शाळेत २० वर्षांपूर्वीचं ‘ते’ एव्हरग्रीन गाणं ऐकून भावुक झाला शाहरुख खान! व्हिडीओ व्हायरल
Bollywood actor Shahrukh khan wear 63000rd Hermes necklace at son abram school annual function
Shahrukh Khan: मुलगा अबरामच्या शाळेतील कार्यक्रमात शाहरुख खानचा खास लूक, गळ्यातल्या नेकलेसची किंमत वाचून व्हाल थक्क
Image Of Chhagan Bhujbal And MLA Suhas Kande.
Chhagan Bhujbal : “भुजबळांचं जेव्हा वाईट होतं तेव्हा मी खुश असतो”, एकनाथ शिंदेंचे आमदार अजित पवारांच्या भेटीनंतर काय बोलून गेले
shani shukra yuti 2024
तब्बल ३० वर्षानंतर शुक्र- शनि युती, २८ डिसेंबरनंतर ‘या’ राशी जगणार राजासारखं जीवन! प्रत्येक कामात मिळणार यश अन् बक्कळ पैसा

वाढदिवसानिमित्त मोठ्या पार्टीचं आयोजन

मिळालेल्या माहितीनुसार शाहरुखचा वाढदिवस मोठ्या स्वरुपात साजरा कऱण्यात येणार आहे. शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त बांद्रा येथील नीता अंबानींच्या क्लचरल सेंटर (NMACC) मध्ये मोठ्या पार्टीचे आयोजन करण्यात आलं आहे. या पार्टीमध्ये करण जोहर, दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, राजकुमार हिराणी, एटली, सिद्धार्थ आनंद यांच्याबरोबर बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत.

चाहत्यांसाठी खास सरप्राईज

मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी ‘डंकी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करणार आहे. ‘पठाण’ आणि ‘जवान’ला मिळालेल्या यशानंतर चाहते शाहरुखच्या ‘डंकी’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. राजकुमार हिराणी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. शाहरुख आणि राजकुमार हिराणी पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत.

हेही वाचा- जावई केएल राहुल नव्हे तर सुनील शेट्टीला आवडतो ‘हा’ खेळाडू, भर कार्यक्रमात अण्णाने केला खुलासा

शाहरुखच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वी त्याचा ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित झाला. जगभरात या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. १००० कोटींपेक्षा अधिकची कमाई करत या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड तोडले होते. आता शाहरुखचा ‘डंकी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Story img Loader