बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ‘जवान’ या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाबद्दल शाहरुखने नुकत्याच केलेल्या एका ट्वीटची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दाक्षिणात्य दिग्दर्शक अटली कुमारच्या ‘जवान’ चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला. प्रदर्शनाआधीपासूनच या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. टीझरमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे शाहरुख खान एका वेगळ्या अवतारात चित्रपटात दिसणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांचीही या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाबद्दल शाहरुख खानने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने चित्रपटातील इतर कलाकारांनाही टॅग केलं आहे. पोस्ट शेअर करत शाहरुखने ‘चिकन ६५’ ची रेसिपी शिकण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

हेही वाचा >> ‘हाऊसफुल ५’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, अक्षय कुमार, रितेशसह चित्रपटात बॉलिवूड कलाकारांची फौज

“हे ३० दिवस फारच छान होते. थलावयादेखील(सुपरस्टार रजनीकांत) सेटवर हजर होते. नयनतारा बरोबर चित्रपट पाहिले तर अनिरुद्धशी गप्पा मारल्या. विजय सेतुपती आणि थलापति विजयने खाऊ घातलेल्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला. अटली आणि प्रियाचे तुम्ही केलेल्या आदरातिथ्यासाठी मन:पुर्वक धन्यवाद!”, असं शाहरुखने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. पुढे त्याने “आता ‘चिकन ६५’ ची रेसिपी शिकावी लागेल”, असं म्हटलं आहे.

हेही वाचा >> ‘आई कुठे काय करते’मधील ‘संजना’चा मेकओव्हर, बदललेल्या लूकमागील कारण समोर

हेही पाहा >> Photos : सोनालीची साडी पाहून चाहत्यांना कमेंट करण्याचा मोह आवरेना, म्हणाले “तुमच्या फॅमिलीत लिंबूवाली…”

शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेला ‘जवान’ हा चित्रपट २०२३च्या जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारासह अभिनेता विजय सेतुपतीदेखील दिसणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल तीन वर्षांनंतर शाहरुख मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. २०१८च्या ‘झीरो’ चित्रपटात तो दिसला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor shah rukh khan tweet on jawan movie said he needs to learn chicken 65 recipe goes viral kak