‘सैराट’च्या हिंदी रिमेकमधून म्हणजेच ‘धडक’मधून इशान खट्टर आणि जान्हवी कपूर या दोन्ही स्टारकिड्सना करण जोहरने इंडस्ट्रीत आणलं. दोघांनाही प्रेक्षकांकडून फारसं प्रेम मिळालं नसलं तरी दोघे सध्या वेगवेगळे प्रयोग करण्यात व्यस्त आहेत. इशान खट्टर हा लवकरच एका हॉरर कॉमेडीमधून समोर येणार आहे. इशान हा अभिनेता शाहिद कपूरचा सावत्र भाऊ आहे. त्यांच्या नात्यात मात्र कधीच तो परकेपणा आपल्याला दिसला नाही. शाहिद हा कायम इशानला स्वतःच्या लहान भावाप्रमाणे वागणूक देतो. नुकतंच शाहिदने दिलेल्या एका मौल्यवान सल्ल्याबद्दल इशानने खुलासा केला आहे.

प्रेमात पडण्याबद्दल शाहिद कपूरने इशानला एक मौल्यवान सल्ला दिला आहे. शाहिदने स्वतः प्रेमात प्रचंड टक्केटोणपे खाल्ल्याने तो यातून बाहेर पडला आहे आणि आज एक मोठा भाऊ या नात्याने शाहिदने त्याच्या भावाला सल्ला दिला आहे. चित्रपटसृष्टीत असल्याने एकमेकांशी नाव जोडलं जाणं या गोष्टी होतच असतात पण त्याचा स्वतःवर कसा परिणाम होऊ द्यायचा नाही हे शाहिदने सांगितलं आहे.

आणखी वाचा : ११ वर्षं जुन्या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक ओटीटीवर; नाना पाटेकरसह तापसी पन्नू दिसणार मुख्य भूमिकेत

मध्यंतरी २०२० मध्ये जेव्हा इशान खट्टर आणि अनन्या पांडे यांचा ‘खाली पिली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा इशान आणि अनन्या एकमेकांना डेट करत असल्याचं समोर आलं होतं. याबद्दल शाहिद आणि त्याची बायको मीरा यांनी त्याला तेव्हा एक सल्ला दिला होता. ‘गुड टाइम्स’शी संवाद साधताना इशान म्हणाला, “माझ्या भावाने मला सांगितलं आहे की, कोणत्याही नात्यात स्वतःला हरवून बसू नकोस. कायम स्वतःची किंमत ठेव, स्वतःचं अस्तित्त्व विसरू नकोस. आणि माझ्यामते हा सर्वात उत्तम सल्ला होता.”

कॉफी विथ करणच्या प्रोग्राममध्येसुद्धा इशानला अनन्याबरोबरच्या नात्याबद्दल विचारलं होतं, पण त्यावर इशानने स्पष्ट उत्तर द्यायचं टाळलं. इशानसध्या कतरिना आणि सिद्धांत यांच्याबरोबर त्याच्या आगामी ‘फोन भूत’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी असून तो ४ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader