बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याच्या ‘ब्लडी डॅडी’ या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, शाहिद कपूरने नुकतंच एका कार्यक्रमात आलिया भट्टबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. शाहिदच्या या वक्तव्यानंतर नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत.

अलीकडेच मुलाखतीदरम्यान शाहिद कपूरला विचारण्यात आले होते की, आलिया भट्टला भेटल्यास काय करशील? शाहिद म्हणाला म्हणाला की, ” मी अलीकडेच आलियाला भेटलो होतो. ती आई झाली आहे, यावर माझा विश्वास बसत नाही. जेव्हा मी आलियाबरोबर काम केलं होतं तेव्हा ती २१ वर्षांची होती. जेव्हा तुम्ही एखाद्याबरोबर खूप वेळ घालवता आणि नंतर खूप दिवस तुम्ही त्या व्यक्तीला भेटत नाहीत. तेव्हा तुम्हाला वाटतं ती व्यक्ती अजूनही तशीच आहे. माझ्याबरोबर असंच काहीसं झालं.”

Raj Babbar daughter knew about his relationship with Smita Patil since she was 7
“ही ती स्त्री आहे जिच्याबरोबर…”, स्मिता पाटील यांच्याबद्दल काय म्हणाली राज बब्बर यांची मुलगी?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Gashmeer Mahajani
“परत तिच्या कुशीत…”, गश्मीर महाजनी आईबद्दल बोलताना म्हणाला, “घरी दोन लहान मुलं…”
Walmik Karad Mother Parubai Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आता मी मेल्यावर पाणी पाजायला…”
aamir khan kiran rao
“त्याची आई अजूनही…”, किरण रावचं आमिर खानच्या कुटुंबाबद्दल भाष्य; त्याच्या मुलांची नावं घेत म्हणाली…
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Couple Murdered Daughter In Law
Crime News : विष मिसळलेली ताडी दिली अन् दगडाने ठेचून… मुलाने मनाविरुद्ध लग्न केले, सासू-सासऱ्याने सुनेला संपवले
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”

हेही वाचा- “सलमान खान दारुड्या अन् मुजोर…” ‘गदर २’चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांचं विधान चर्चेत

आलिया भट्टबाबत केलेल्या या वक्तव्यामुळे शाहिद कपूरला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. काही नेटकऱ्यांनी शाहिदला मीराचं उदाहरण देत ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे, “मीरा राजपूत वयाच्या २१ व्या वर्षी आई झाली होती.” एका युजरने लिहिले, “जेव्हा दोघांनी लग्न केले तेव्हा मीरा २० वर्षांची होती आणि शाहिद ३४ वर्षांचा होता. आलिया मीरापेक्षा फक्त एक वर्षाने मोठी आहे.” दुसर्‍या युजरने कमेंट केली, “त्याला मूल झाले तेव्हा त्याची बायको २१ वर्षांची नव्हती का?

हेही वाचा- “ती एक…” होणाऱ्या नातसुनेबाबत धर्मेंद्र यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले..

तर काही चाहते शाहिदची बाजू घेताना दिसत आहे. एका चाहत्याने शाहिदच्या बचावात कमेंटमध्ये लिहिलं आहे. “आलिया आई बनली आहे. यावर शाहिदचा विश्वास बसत नाहीये. त्याच्या मते आलिया आई बनण्यासाठी लहान आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिलं आहे, “शाहिदने आलियाच्या वयाबाबत कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.”

Story img Loader