प्रेक्षक आणि चित्रपट यांच्यात एक वेगळेच नाते असते. चित्रपट चालावेत यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे प्रेक्षक. ज्येष्ठ नट बालगंधर्व यांनी प्रेक्षकांना देवाची उपमा देत असत. प्रेक्षक हा राजा असतो असे मानले जाते मात्र काही प्रेक्षकांवर बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान नाराज आहे. बोललीवूडच्या या किंग खानचे आज जगभरात चाहते आहेत. त्याच्या चित्रपटांना प्रेक्षक गर्दी करतात मात्र हाच शाहरुख खान प्रेक्षकांबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे.
शाहरुख खान ‘यादों की बारात’ या साजिद खानच्या कार्य्रक्रमात म्हणाला होता, ‘मला अशा प्रेक्षकांचा खूप राग येतो जे चित्रपट बघण्यासाठी येतात मात्र पॉपकॉर्न खातात, गप्पा मारतात, आजकाल मोबाईलचे प्रमाण वाढत असल्याने लोक मोबाईलवर बघत बसतात. चित्रपट बघताना ते एखादा संवाद सुरु असेल तर दुसरीकडे एखादा प्रेक्षक मोबाईल बघत असतो. मात्र काही प्रेक्षक एकाग्रतेने एक एक सीन बघत असतात’.
शाहरुख खान पुढे म्हणाला ‘मी ‘दिलवाले दुलहनिया’ चित्रपट बघायला चित्रपटगृहात गेलो होतो. मागे मी लपून प्रेक्षकांना बघत होतो. काही प्रेक्षक एकमेकांशी गप्पा मार्ट होते मला राग-आला मात्र मला असे कळले की हे प्रेक्षक चौथ्यांदा हा चित्रपट बघण्यासाठी आले होते. मला लोक चित्रपट बघताना इतर गोष्टी करतात त्याचा राग येतो’.
‘देवयानी’ मालिकेतील अभिनेत्रीचा साखरपुडा संपन्न, फोटो आले समोर
शाहरुख खानने दिवाना चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याआधी त्याने ‘फौजी’ , ‘सर्कस’ या मालिकांमध्ये काम केले होते. ‘डर’, ‘करण अर्जुन’, ‘कोयला’, ‘कुछ कुछ होता हैं’ यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात त्याने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.
शाहरुख सध्या ‘जवान’, ‘पठाण’ या चित्रपटांवर काम करत आहे. यासाठी तो मेहनत घेत आहे. झिरो’ या चित्रपटात तो शेवटचा दिसला होता. नुकताच तो ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून दिसला होता. त्याचा ‘पठाण’ २५ जानेवारी २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर येणार आहे. मल्टीस्टारर चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. हा चित्रपट हाय-ऑक्टेन अॅक्शन फिल्म असल्याचं म्हटलं जात आहे.