सध्या ‘आदिपुरुष’ चित्रपटातील व्हीएफएक्सवरून वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटाला आणीत त्यातील व्हीएफएक्स इफेक्ट्सना बरंच ट्रोल केलं जात आहे. ज्या व्हीएफएक्स कंपनीने या चित्रपटाला इफेक्ट्स दिले आहेत त्या कंपनीनेदेखील यातून काढता पाय घेतला आहे. हॉलिवूड चित्रपटांमध्ये व्हीएफएक्स इफेक्ट्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र आता बॉलिवूड दाक्षिणात्य चित्रपटांमध्येदेखील याचा वापर केला जातो. अभिनेता शाहरुख खान बॉलिवूडमध्ये जितका अभिनयासाठी प्रसिद्ध आहे तितकाच तो एक व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध आहे. त्याची स्वःची रेड चिलीज नावाची व्हीएफएक्स कंपनी आहे.
शाहरुख खानची प्रत्येक गोष्ट ही कायमच चर्चा होत असते त्याच्या राहत्या घरच्या नावापासून ते अगदी त्याने सुरु केलेल्या व्हीएफएक्स कंपनीपर्यंत, सगळ्याच गोष्टीं लोकांचे लक्ष वेधून घेतात. शाहरुखने हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत असे सांगितले की, ‘जुही चावलाने मला एकदा विचारले होते की तू तुझ्या या कंपनीचे नाव रेड चिलीज असे का ठेवले आहेस? त्यावर मी तिला म्हणालो चित्रपट बनवण्यात मी अयशस्वी झालो तर मी त्याच नावाने रेस्टॉरंट उघडेन. निदान माझे ते रेस्टॉरंट तरी चालेल’. शाहरुखची ही या कंपनीने अनेक चित्रपटांच्या सह निर्मितीतदेखील भाग घेतला आहे. ‘डिअर जिंदगी’, ‘हॅपी न्यू इयर’ ‘क्रिश ३’, ‘रा. वन’, ‘फिल्लौरी’ आणि ‘दिल धडकने दो’ या चित्रपटांच्या व्हिज्युअल इफेक्टसवर कंपनीने काम केले आहे.
“माझ्या वयामुळे…” बॉलिवूडमध्ये काम न मिळाल्याबद्दल सुश्मिता सेनने केला होता खुलासा
या कंपनीचे मूळ नाव ड्रीम्स अनलिमिटेड असे होते. शाहरुख खान, जुही चावला आणि अझीझ मिर्झा यांनी ही १९९९ मध्ये कंपनी सुरु केली होती. २००० साली प्रदर्शित झालेल्या ‘फिर भी दिल हैं हिंदुस्थानी’ चित्रपटाची निर्मित या कंपनीने केली होती. २००३ मध्ये या कंपनीचे नाव ‘रेड चिलीज’ असे करण्यात आले. रेड चिलीजने २००४ साली आलेल्या ‘मै हुना’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. शाहरुखच्या २००७ साली आलेल्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटात व्हीएफएक्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला होता.
दरम्यान शाहरुख खान त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ‘पठाण’बरोबर त्याचा ‘जवान’ चित्रपटही पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खान तीन वर्षांनंतर चित्रपटांची मेजवानी घेऊन येत असल्यामुळे चाहतेही खूश आहेत. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झीरो’ चित्रपटात तो दिसला होता