बॉलिवूडमधील नेपोटीजमबद्दल बरीच चर्चा सोशल मीडियावर होत असते. गेली काही वर्षं याबद्दल बरंच काही बोललं आणि लिहिलं गेलं आहे. सोशल मीडियावर सतत या स्टारकिड्सवर टीका होताना आपण पाहतो. काही महिन्यांपूर्वी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं.मात्र आता आर्यन खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आर्यन खानने सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करत याबद्दल खुलासा केला आहे.आपल्याच वडिलांच्या प्रोडक्शन कंपनीच्या प्रोजेक्टमधून आर्यन खान अभिनेता म्हणून नव्हे तर लेखक म्हणून लोकांच्या समोर येणार आहे. ही पोस्ट शेअर करत आर्यनने लिहिलं, “लिखाणाचे काम पूर्ण झाले आहे आता शूटिंगसाठी उत्सुक आहे.” आर्यन ज्या वेबसिरीजचं काम करतोय त्याचं लिखाण आणि दिग्दर्शनही तोच करणार असल्याची चर्चा आहे. यावरच शाहरुख खानने कमेंट केली आहे.

“आता प्रेक्षकांना…” दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटांवर प्रकाश राज यांनी केलं भाष्य

शाहरुख खान सोशल मीडियावर सक्रीय असतो. त्याने आर्यनच्या पोस्टवर कमेंट केली आहे, ज्यात तो म्हणाला, “वाह , विचार करणं, विश्वास ठेवणं आता करून दाखवण्याची वेळ आली, पहिल्या कामासाठी शुभेच्छा पाहिलं काम खास असतं.” यावर आर्यनने कमेंट केली की “धन्यवाद, सेटवर तुमच्या सरप्राइज भेटीची वाट बघतोय,” यावर शाहरुख खानने कमेंट केली “नक्कीच पण चित्रीकरणाची वेळी दुपारची असावी सकाळी लवकर नको,” अशा शब्दात त्याने प्रतिक्रिया दिली.

आर्यनने परदेशातून फिल्ममेकिंगचे शिक्षण घेतले आहे. लवकरच एक स्टारकीड आपल्याला एका लेखकाच्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. शाहरुखची मुलगी सुहाना ही झोया अख्तरच्या वेबसीरिजमधून पदार्पण करणार आहे. सुहानाने अभिनयात करियर करायचं निश्चित केलं आहे. लवकरच तिची आगामी सिरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor shahrukh khan tell son that he will visit on his set but with condition spg