२०२२ संपलं आणि २०२३ सुरु झालं, नव्या वर्षाचं स्वागत सामान्य जनतेपासून ते अगदी बॉलिवूडच्या कलाकारांपर्यंत सगळयांनी अगदी जोशात केलं. बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खाननेदेखील चाहत्यांना नववर्षाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडीओ शेअर करत त्याने प्रेक्षकांना पठाण बघण्याचे आवाहन केले आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये एकाच चित्रपटाची हवा आहे तो चित्रपट म्हणजे शाहरुख खानचा पठाण, आधीच या चित्रपटावरून वाद निर्माण झाले आहेत. अशातच शाहरुखने यशराज फिल्म्सच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो असं म्हणतो, “या वर्षाची सुरवात धमाकेदार ,धुवांधार ,अ‍ॅक्शनने व्हायला हवी,आणि पठाणबरोबर व्हायला हवी, सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा! २५ जानेवारीला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात ‘पठाण’ पाहायला विसरू नका.” अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल
kareena Kapoor
“आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”

चित्रपटातील पहिलं गाणं ‘बेशरम रंग’ प्रदर्शित झालं आणि दीपिकाच्या भगव्या बिकिनीवरून गदारोळ माजला. आता तर सेन्सॉर बोर्डाने या गाण्यात बदल करण्याचेही आदेश दिले आहेत. भगव्या बिकिनीमुळे झालेल्या गोंधळात चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणीही होऊ लागली होती.

शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेला ‘पठाण’ हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण व जॉन अब्राहमही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Story img Loader