बॉलीवूडच्या किंग खानचा बहुप्रतिक्षित ‘जवान’ चित्रपटाने दमदार सुरुवात केली आहे. प्रदर्शित होताच या चित्रपटाने नवे रेकॉर्ड बनवले आहेत. ओपनिंग डेला ‘जवान’ने इतिहास रचला आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं पहिल्याच दिवशी ६५ कोटींची कमाई केली आहे. तसेच यूएसएमध्ये या चित्रपटाची ३३ हजार तिकिटे विकली गेली आहेत. या आठवड्यात ‘जवान’ ४०० कोटींची कमाई करण्याची शक्यता आहे. असा हा सुपरहिट चित्रपट एक मराठमोळा अभिनेत्याने पायऱ्यांवर बसून पाहिला आहे. याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – गिरीजा ओकचा मुलगा शाहरुख खानला भेटला अन्…; अभिनेत्रीने सांगितलं काय होती लेकाची प्रतिक्रिया

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”

शाहरुखचा चाहता वर्ग बराच मोठा आहे. यामध्ये सर्वसामान्य लोकांबरोबर कलाकार मंडळींचा देखील समावेश आहे. अनेक कलाकार मंडळी शाहरुख चाहते आहेत. अशातच सध्या सोशल मीडियावर एका मराठमोळ्या अभिनेत्याचा शाहरुखचा ‘जवान’ चित्रपट पाहतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये हा अभिनेता पायऱ्यांवर बसून ‘जवान’ पाहताना दिसत आहे.

हेही वाचा – ‘वीडी 18’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वरुण धवनला दुखापत; व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

हा मराठमोळा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून शरद केळकर आहे. शरद केळकर हा मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने शाहरुखचा ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्याच दिवशी पाहिला. शरदने चित्रपटगृहातील पायऱ्यांवर बसलेला फोटो शेअर करत लिहीलं आहे की, “पायऱ्यांवर बसून का होईन पण आज ‘जवान’ पाहायचाच होता.”

हेही वाचा – ‘जवान’च्या शूटिंगदरम्यान शाहरुख खानने मागितली होती सहकलाकारांची माफी; किस्सा सांगत गिरीजा ओक म्हणाली…

मात्र शरद केळकरची ही पोस्ट काही नेटकऱ्यांना खटकली आहे. एका नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “मी पण असाच बसलो होतो पण चित्रपट दुसरा होता ‘सुभेदार'” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “एवढं प्रेम ‘सुभेदार’ चित्रपटला दिलं असतं तर बरं झालं असतं.” तर तिसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “आता फक्त एकच ध्यास मराठी चित्रपट हाच आमचा श्वास.”

हेही वाचा – शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘जवान’ चित्रपटासाठी अभिनेत्री गिरीजा ओकची ऑडिशन कशी झाली? तिनेच सांगितला किस्सा

दरम्यान, ‘सुभेदार’ चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाची यशस्वी घौडदौड सुरू आहे. प्रदर्शित होताच पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने ८ कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.

Story img Loader