Shreyas Talpade discharged from hospital : अभिनेता श्रेयस तळपदेला १४ डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. श्रेयसची पत्नी दीप्तीने याबाबत पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत श्रेयस घरी परतल्याची आनंदाची बातमी दिली. या कठीण काळात साथ देणाऱ्या प्रत्येकाचे दीप्तीने आभार मानले आहेत.

दीप्तीने लिहिलं, “माझं जीवन, माझा श्रेयस पूर्णपणे बरा झाला आहे आणि घरी परतला आहे. कोणावर विश्वास ठेवायचा यावरून मी श्रेयसशी नेहमीच वाद घालत असे. पण आज मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. आणि ते उत्तर देव आहे. ही भयंकर घटना घडली त्या दिवशी संध्याकाळी देव माझ्याबरोबर होता. आता मी कधीच त्याच्या अस्तित्वावर शंका घेणार नाही की तो आहे की नाही. त्या संध्याकाळी ज्यांनी मला मदत केली त्या प्रत्येकाचे मी आभार मानू इच्छितो. मी एका व्यक्तीकडे मदत मागितली आणि १० हात मदतीला आले. श्रेयस गाडीच्या आत पडलेला होता, पण ते लोक कोणाला मदत करत आहेत हे त्यांना माहीत नव्हतं, तरी ते मदतीला धावून आले.”

What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार का? विचारताच अजित पवारांचं उत्तर, “मी इतकं स्पष्ट सांगतो….”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Hrishikesh Shelar
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’फेम अभिनेत्याने प्रियदर्शन जाधव, विशाखा सुभेदार यांच्याबरोबर काम करण्याचा सांगितला अनुभव, म्हणाला…
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Domestic Violence Against Men
Domestic Violence : “ती माझ्या भावाला बेडरूमध्येही येऊ देत नव्हती”, तरुणीचा व्हिडिओ व्हायरल; वहिनीवर केले गंभीर आरोप
रोलरखाली चिरडून मजुराचा मृत्यू
Dhananjay Deshmukh News
Dhananjay Deshmukh : “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शब्द दिलाय..”, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख काय म्हणाले?

“तुमच्या मुलाला खूप…”, ‘अ‍ॅनिमल’ मध्ये रणबीर कपूरसह काम केल्यानंतर दिग्गज अभिनेत्याने नीतू कपूर यांना केला होता मेसेज

दीप्तीने पुढे लिहिलं, “मी त्या सर्व लोकांचे आभार मानू इच्छिते जे त्या दिवशी माझ्यासाठी देव बनून मदतीला आले होते. मला आशा आहे की माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्हा सर्वांची मी सदैव ऋणी राहीन. मुंबई हे असं एक शहर आहे, ज्याने इथं आम्हाला एकटं सोडलं नाही तर आमची काळजी घेतली. मी आमचे सर्व मित्र, कुटुंबातील सदस्य आणि मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील मंडळींचे आभार मानते. हे लोक आपलं काम सोडून आमच्या मदतीला आले होते.

“१० मिनिटांसाठी त्याचं ह्रदय बंद पडलं होतं”, श्रेयस तळपदेच्या प्रकृतीविषयी बॉबी देओलची माहिती

दीप्ती पुढे म्हणाली, ‘मी बेले व्ह्यू हॉस्पिटलच्या टीमचे आभार मानू इच्छिते, ज्यांनी त्वरित उपचार करून माझ्या पतीला वाचवले. सर्व डॉक्टर, परिचारिका, भाऊ, मुलं, मावशी, प्रशासन आणि सुरक्षा टीम तुमचं काम पैशांत मोजता येऊ शकत नाही.” यावेळी दीप्तीने श्रेयसच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या प्रत्येक चाहत्याचे व व्यक्तीचे आभार मानले.

Story img Loader