Shreyas Talpade reacts on Death Rumors: अभिनेता श्रेयस तळपदेला १५ डिसेंबर २०२३ रोजी हृदयविकाराचा झटका आला. उपचारानंतर तो बरा झाला आणि आता ठणठणीत आहे, पण तरीही त्याला पोस्ट करून तो हयात असल्याचं स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. श्रेयसने इन्स्टाग्रामवर यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रेयसने लिहिलं, “मी जिवंत आहे, आनंदी आहे व निरोगी आहे हेच मी सर्वांना सांगू इच्छितो. माझ्या निधनाची माहिती देणाऱ्या एका व्हायरल पोस्टबद्दल मला कळालं. विनोद मी समजू शकतो, पण जेव्हा त्याचा गैरवापर केला जातो तेव्हा खरा त्रास होतो. एखाद्याच्या विनोदातून सुरू झालेली गोष्ट आता अनावश्यक काळजीचं निर्माण करत आहे, तसेच माझ्यासाठी काळजी करणाऱ्या लोकांच्या, खासकरून माझ्या कुटुंबाच्या भावनांशी खेळ होत आहे.”

“आपल्या समाजात जातीयवाद…”; ‘स्त्री २’ फेम अभिनेत्याचं वक्तव्य; म्हणाला, “हजारो वर्षांपासून प्रचलित…”

“माझी लहान मुलगी रोज शाळेत जाते, ती आधीच माझ्या आरोग्याबद्दल काळजीत आहे, ती सतत मला प्रश्न विचारत असते. या खोट्या बातमीमुळे तिची भीती आणखी वाढतेय. तिला तिच्या शाळेत याबद्दल शिक्षकांकडून, वर्गमित्रांकडून प्रश्न विचारण्यात येत आहेत. तिला आम्ही कुटुंब म्हणून सांभाळण्याचा प्रयत्न करतोय,” असं श्रेयस म्हणाला.

अभिनेता श्रेयस तळपदे (फोटो – इन्स्टाग्राम)

सलमान खान ‘या’ चित्रपटात ऐश्वर्या रायच्या भावाची भूमिका साकारणार होता, पण…; अभिनेत्रीनेच सांगितलेला किस्सा

“अशा पोस्ट करणाऱ्या व फॉरवर्ड करणाऱ्यांनी हे थांबवावं आणि या पोस्टच्या होणाऱ्या परिणामांचा विचार करावा. बऱ्याच लोकांनी माझ्या आरोग्यासाठी मनापासून प्रार्थना केली आहे. लोकांच्या भावना दुखावण्यासाठी विनोदाचा वापर केला जातोय हे पाहून वाईट वाटतंय. कारण या गोष्टी माझ्या जवळच्या लोकांना त्रास देऊ शकतात आणि आमच्या आयुष्यात व्यत्यय आणतात. जेव्हा तुम्ही अशा अफवा पसरवता तेव्हा त्याचा परिणाम फक्त त्या व्यक्तीवर होत नाही, तिच्या कुटुंबावरही परिणाम होतो. खासकरून लहान मुलं जे या गोष्टी समजू शकत नाही,” असं श्रेयसने म्हटलंय.

“ज्यांनी माझी विचारपूस केली, त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. तुमची काळजी आणि प्रेमच माझ्यासाठी सर्वकाही आही. ट्रोल्सना, माझी एकच विनंती आहे की कृपया हे सगळं थांबवा. दुसऱ्यांवर असे विनोद करू नका. तुमच्याबरोबरही असं काही घडावं असं मला कधीच वाटणार नाही, त्यामुळे थोडे संवेदनशील व्हा,” असं श्रेयस तळपदे त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला आहे.

श्रेयसच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. काही चाहत्यांनी ती व्हायरल पोस्ट पाहून धक्का बसला होता, असं म्हटलं आहे. तर काहींनी अशा खोट्या अफवा पसरवणाऱ्यांना देव सद्बुद्धी देवो, असं लिहिलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor shreyas talpade reacts on his death rumors hrc