२०२१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘पुष्पा’ हा चित्रपट प्रचंड गाजला. तर त्यापाठोपाठ लवकरच ‘पुष्पा-२’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर ‘पुष्पा २’मधील अल्लू अर्जुनची पहिली झलक काल समोर आली आहे. याचबरोबर या चित्रपटाचा उत्कंठावर्षक टीझरही काल प्रदर्शित झाला. या टीझरला सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळत आहे. आता आज अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी ‘पुष्पा २’चा टीझर शेअर करत अभिनेता श्रेयस तळपदे याने खास पोस्ट लिहिली आहे.

श्रेयस तळपदेने ‘पुष्पा’ चित्रपटातील अल्लू अर्जुनने साकारलेल्या ‘पुष्पा’ या भूमिकेला हिंदी व्हर्जनसाठी आवाज दिला होता. श्रेयस तळपदे याने केलेल्या या कामाचं खूप कौतुक झालं. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्येही पुष्पा या भूमिकेसाठी आपल्याला श्रेयस तळपदेचा आवाज ऐकू येणार आहे. आज अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त श्रेयसने हा टीझर शेअर करत त्याचा या चित्रपटासाठी डबिंग करण्याचा अनुभव शेअर केला आहे.

Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
Siddharth Statement on crowd of 'Pushpa 2'
‘पुष्पा २’च्या ट्रेलर लाँचवेळी पाटण्यात जमलेल्या गर्दीवर सिद्धार्थचं वक्तव्य; म्हणाला, “जेसीबीचं काम सुरू असताना…”
Krunal Pandya in Pushpa 2 Tarak Ponappa looks like Indian Cricketer Know The Truth Behind Viral Photos
Pushpa 2: ‘पुष्पा २’ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत भारताचा क्रिकेटपटू? व्हायरल फोटोंमागचं काय आहे सत्य?
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
Maharashtrachi Hasya Jatra inside rehearsal video
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘अशी’ होते रिहर्सल! शिवालीने केलं भन्नाट ‘टंग ट्विस्टर’, मालवणी भाषा अन्…; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा : महागड्या गाड्या, आलिशान घर अन्…; ‘पुष्पा’ खऱ्या आयुष्यात आहे ‘इतक्या’ संपत्तीचा मालक, आकडा वाचून व्हाल थक्क

आज श्रेयस तळपदेने ‘पुष्पा २चा हिंदी टीझर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. या टीझरमध्ये ‘पुष्पा’ तिरुपती तुरुंगातून फरार असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तर यामुळे शहरात दंगलीसदृश परिस्थिती निर्माण झाली असून सर्वांना एकाच प्रश्न पडला आहे की “पुष्पा कुठे आहे?” एकीकडे पोलीस पुष्पाला शोधताना दिसत आहेत, तर दुसरीकडे लोक पुष्पाने त्यांना मदत केल्याबद्दल त्याचं कौतुक करताना दिसत आहेत. या टीझरच्या अखेरीस या अल्लू अर्जुनचीही झलक दिसते.

हेही वाचा : Pushpa 2 Teaser: दंगली, जाळपोळ, पुष्पाचा शोध अन्…; ‘पुष्पा २’चा उत्कंठावर्धक टीझर प्रदर्शित

हा टीझर शेअर करत श्रेयसने लिहिलं, “अब रुल पुष्पा का… और पुष्पा कभी झुकेगा नही साला… अल्लू अर्जुनजी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा हा दिवस आणि येणारी सगळी वर्ष या टीझरसारखीच जबरदस्त जावो. एक दिवस मी ती शेवटची ओळ डब करण्यासाठी गेलो आणि पुन्हा सर्व आठवणी माझ्या मनात जाग्या झाल्या. काय सुरेख अनुभव होता तो!” आता त्याची ही पोस्ट खूप चर्चेत आली असून त्याचे चाहते ‘पुष्पा २’बद्दल उत्सुकता व्यक्त करत आहेत.

Story img Loader