अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याचं काल ११ नोव्हेंबरला निधन झालं. ‘कुसुम’, ‘वारीस’, आणि ‘सूर्यपुत्र कर्ण’ या मालिकांमधील त्याच्या भूमिका विशेष गाजल्या. त्याच्यामागे त्याची पत्नी अलेसिया आणि दोन मुलं असा परिवार आहे. दरम्यान, जिममध्ये व्यायाम करत असतानाच सिद्धांत याला हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाल्याची माहिती समोर आली. आता आज संध्याकाळी त्याच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.

काल वयाच्या ४६ व्या वर्षी सिद्धांत वीर सूर्यवंशीने अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी अडीचच्या सुमारास त्याचे पार्थिव सांताक्रूझ स्मशानभूमीत नेण्यात आले आणि त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारचे सगळे विधी त्याची मुलगी डिझा सूर्यवंशी हिने पार पाडले. यावेळी त्याचे नातेवाईक आणि जवळचे मित्रमंडळी उपास्थित होते.

हेही वाचा : पहिल्या पत्नीला घटस्फोट, सह कलाकारासह अफेअर अन् रशियन मॉडेलसह थाटला होता नव्याने संसार; वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होता सिद्धांत सूर्यवंशी

त्याच्या निधानाने मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली. त्याच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकार आले होते. जय भानुशाली, आरती सिंग, रोहित वर्मा, जस्वीर कौर, विवेक मुश्रान, अमित बेहल हे कलाकार त्याच्या अंत्यविधीला उपस्थित होते.

आणखी वाचा : महेंद्रसिंग धोनी मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज; ‘या’ चित्रपटात साकारणार महत्वपूर्ण भूमिका

जिममध्ये व्यायम करत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आहे. यादरम्यान सिद्धांत जमिनीवर कोसळला. सिद्धांतच्या निधनानंतर कलाकार मंडळींनाही मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियाद्वारे सिद्धांतला श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.