बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये सोनू सूदचे नाव घेतले जाते. लॉकडाऊन दरम्यान देशातील गरजू लोकांना मदत केल्यामुळे सोनू सूदला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. सध्या सोनू सूद हा ‘फतेह’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच अभिनेत्याने ट्विटरवर ‘आस्क सोनू’ हे सेशन घेतले होते. यावेळी सोनूने चाहत्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला समर्पक उत्तरे दिली.

हेही वाचा : केवळ ‘या’ कारणाने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापला केलेलं रिजेक्ट, धक्कादायक अनुभव सांगत म्हणाला…

Ramesh Bidhuri on Delhi CM Atishi
Ramesh Bidhuri : “दिल्लीच्या रस्त्यांवर हरिणीप्रमाणे…”, भाजपाच्या रमेश बिधुरींचं पुन्हा मुख्यमंत्री आतिशी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Rahul Gandhi Criticized Mohan Bhagwat
Rahul Gandhi :”…तर मोहन भागवतांना अटक झाली असती”, राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
kalyan bar loksatta news
कल्याणमध्ये बारमधील गायिकेला मद्याची बाटली मारण्याचा प्रयत्न; बारमालकाला ग्राहकांची मारहाण, दोन जण अटकेत

ट्विटरवर ‘आस्क सोनू’ सेशनमध्ये अभिनेत्याच्या एका चाहत्याने त्याला प्रश्न विचारला की, “सर देव करो असे होऊ नये पण, भविष्यात तुमचे चित्रपट फ्लॉप झाले, तर तुम्ही कॅनडाचे नागरिकत्व स्वीकाराल का?” या प्रश्नाला उत्तर देत सोनू सूद म्हणाला, माझे आयुष्य चित्रपटांपेक्षा खूप वेगळे आहे आणि मित्रा, माझ्यासाठी हिंदुस्थानपेक्षा श्रेष्ठ काहीच नाही.’ सोनू सूदचे हे उत्तर पाहून त्याच्या चाहत्यांनी त्याचे कौतुक करीत “तू आमचे मन जिंकलेस” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा : “…आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप नवाजुद्दिनवर भडकला”, अभिनेत्याने सांगितला ‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’च्या सेटवरचा ‘तो’ किस्सा

सोनू सूदच्या आणखी एका चाहत्याने “तुला काही लोक देव समजतात यावर तुझे म्हणणे काय?” यावर अभिनेता म्हणाला, “मी एक साधा माणूस आहे आणि या देशातील प्रत्येक माणसाशी जोडण्याचा मी प्रयत्न करीत आहे.” ट्विटरवर अनेकदा शाहरुख खान, सोनू सूद यांसारखे कलाकार ‘आस्क मी सेशन’ घेऊन चाहत्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देतात.

हेही वाचा : बॉलीवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलंत का? बालपणी व्हायचं होतं वैमानिक, पण…

दरम्यान, अभिनेता सोनू सूद लवकरच ‘फतेह’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटासाठी सोनू प्रचंड मेहनत घेत असून त्याने त्याच्या वर्कआउटचे अनेक व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. ‘फतेह’ मध्ये सोनूबरोबर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस प्रमुख भूमिका साकारणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

Story img Loader