बहुप्रतीक्षित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट अखेर आज प्रदर्शित झाला आहे. गेले अनेक महिने या चित्रपटाची सर्व जण आतुरतेने वाट बघत होते. या बिग बजेट हिंदी चित्रपटात काही मराठी कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहेत. याचबरोबर मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत याने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आता या चित्रपटाच्या टीमसाठी अभिनेता सुबोध भावेने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘आदिपुरुष’ या चित्रपटामध्ये प्रभास श्रीरामांच्या भूमिकेत दिसत आहे, क्रिती सेनॉन हिने सीतेची भूमिका साकारली आहे, तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे हा हनुमानाच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाच्या गाण्यांना आणि ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांबरोबरच कलाकारांना देखील या चित्रपटाची उत्सुकता होती. सुबोध भावेने आता या चित्रपटाच्या रिलीजनिमित्त एक पोस्ट शेअर करत टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा : ‘कट्यार काळजात घुसली’ला ७ वर्ष पूर्ण होताच सुबोध भावेची मोठी घोषणा, पुन्हा प्रेक्षकांना देणार सांगीतिक मेजवानी

सुबोध भावेने या चित्रपटाचं एक पोस्टर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलं. हे पोस्टर शेअर करत त्याने लिहिलं, “मित्रांनो, तुम्ही पाहिलेलं एक सुंदर स्वप्न आज प्रत्यक्षात उतरलं आहे. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा! जय श्रीराम.” सुबोधने केलेली ही पोस्ट आता खूप चर्चेत आली असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा : बिरबलाच्या भूमिकेतील फर्स्ट लूकमुळे सुबोध भावे ट्रोल, नेटकरी म्हणाले, “अरे देवा…”

सुबोध भावे आणि या चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. सुबोध भावेची प्रमुख भूमिका असलेल्या ‘लोकमान्य- एक युगपुरुष’ या चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊतने केलं होतं. तर आता ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट सर्वत्र चांगली कमाई करेल, असा अंदाज सर्व जण व्यक्त करत आहेत.