हिंदी चित्रपटसृष्टीतील तगड्या कलाकारांचा उल्लेख केला तर त्यात सुनील शेट्टीचे नावाचा समावेश होतो. सुनील शेट्टी त्याच्या अप्रतिम अभिनयासाठी आणि निर्दोष शैलीसाठी प्रसिद्ध आहे. दरम्यान, सुनील शेट्टीने सोशल मीडियाचा आयुष्यावर होणाऱ्या परिणामाबाबत खुलेपणाने सांगितले आहे. सोशल मीडिया हे कशाप्रकारे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं आणि त्यामुळेच बोलण्याची भीती वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुलगी अथिया शेट्टीला जेव्हा ट्रोल केलं जातं, तेव्हा खूप वाईट वाटत असल्याचीही भावना त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा- आली रे आली, ‘सिंघम अगेन’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली; लवकरच शूटिंगला होणार सुरुवात
नुकतचं सुनील शेट्टींनी ‘द रणबीर’ शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी सुनील शेट्टी यांना आधुनिक युगात सोशल मीडियाची वाढती क्रेझ आणि प्रभाव याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर सुनील शेट्टी म्हणाले की, ‘सोशल मीडिया तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. कधी-कधी ह्यामुळे मला जास्त बोलायला भीती वाटते. शेट्टी म्हणाले, “सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात काहीच प्रायव्हसी शिल्लक राहिली नाही. त्यामुळे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. एखादं वक्तव्य १५ विविध प्रकारे एडिट केलं जातं आणि त्याचे १५ विविध अर्थ काढले जातात. त्यामुळे मला मोकळेपणे बोलण्याचीही भीत वाटते.”
कोणत्याही गोष्टीवर मतं मांडताना तुम्ही आम्हाला विचार करायला भाग पाडता. कारण जे आम्ही केलंच नाही त्यावरूनही सतत आमच्यावर टीका होत असते. हे टीका करणारे कोण असतात? ज्यांना मी ट्विटर किंवा फेसबुकवरही ओळखत नाही. माझ्या कुटुंबाला शिवीगाळ करणे, माझ्या मुलीला अथियाला शिवीगाळ करणे. हे सगळं पाहून मला खूप वाईट वाटतं. कारण मी जुन्या विचारांचा आहे”, हे सर्व पाहून त्याला खूप वाईट वाटते. मात्र, हे सर्व पाहून आपण गप्प बसणार नसल्याचेही सुनील शेट्टीचे म्हणणे आहे. सुनील शेट्टी म्हणाला ट्रोलिंगबद्दल शांत बसणार नाही. पुढं तो म्हणाला, “ मी शेट्टींचा मुलगा आहे हे तुम्हाला माहितीये. मी कधीच शांत बसणार नाही. असं ते म्हणाले.
हेही वाचा- कतरिना कैफ गरोदर? सलमान खानच्या बहिणीच्या ईद पार्टीतल्या ‘त्या’ VIDEO नंतर चर्चा
सुनील शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर त्यांचा वेब शो हंटर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ज्याला लोकांचा संमिश्र प्रतिसादही मिळत आहे. याशिवाय हेरा फेरी ३ ही लवरकच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात सुनील शेट्टींबरोबर परेश रावल आणि अक्षय कुमारही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.