बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी हा कायमच चर्चेत असतो. उत्कृष्ट अभिनय आणि स्टंटबाजीच्या जोरावर त्याने सिनेसृष्टीमध्ये आपलं भक्कम स्थान निर्माण केले. बॉलिवूडचा अण्णा म्हणून त्याला ओळखले जाते. नुकतंच सुनील शेट्टीने अभिनयानंतर सूत्रसंचालनातही पाऊल ठेवले. या निमित्ताने सुनील शेट्टीने दिलेल्या एका मुलाखतीत हल्ली सिनेसृष्टीतील अॅक्शन स्टंटबद्दल भाष्य केले.
सुनील शेट्टीने हा भारताचा पहिलाच एमएमए रिअॅलिटी शो होस्ट करणार आहे. एमएक्स प्लेयरवर ‘कुमाइट १ वॉरियर हंट’ या शो चे सूत्रसंचालन तो करणार आहे. या निमित्ताने त्याने एक मुलाखत दिली. त्यावेळी त्याला चित्रपटाच्या अॅक्शन स्टंटबद्दल विचारणा करण्यात आली.
आणखी वाचा : “मला काढून टाकावं…” सिनेसृष्टीतून निवृत्ती घेण्याबद्दल शाहरुख खानचे मोठे वक्तव्य
यावेळी सुनील शेट्टी म्हणाला, “आजकालचे कलाकार अॅक्शन हिरोची पदवी मिळवण्याच्या प्रयत्नात स्टंटबाजी करण्यापेक्षा त्यांच्या देहबोलीवर जास्त लक्ष केंद्रीत करतात. आज ज्याची बॉडी आहे, तोच अॅक्शन हिरोसारखा दिसू शकतो.”
“पूर्वी अॅक्शन हिरो बनणे सोपे नव्हते, कारण त्यावेळी कलाकारांना स्वतःचे स्टंट स्वतःच करावे लागायचे. सर्व काही स्वतःला करायचे होते. आमची सुरक्षा, तंत्रज्ञान आणि इतर सर्व गोष्टींची काळजी आम्हालाच घ्यावी लागायची. त्याकाळी अॅक्शन हिरोचा दर्जा मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागायचा. तसेच स्टंट करताना खूप जोखीम पत्करावी लागायची”, असेही त्याने म्हटले.
आणखी वाचा : “आमच्या दोघांमध्ये भांडण…” अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल शत्रुघ्न सिन्हा स्पष्टच बोलले
“ज्यावेळी मोहरा आणि बॉर्डर हे चित्रपट प्रदर्शित झाले होते, तेव्हा अॅक्शनपट हे वेगळे असायचे. त्यांची स्वत:ची एक वेगळी शैली होती. ज्यामुळे ते चित्रपट हिट ठरले”, असे सुनील शेट्टीने सांगितले.
दरम्यान नुकतंच सुनीलची लेक अथिया शेट्टी विवाहबंधनात अडकली. खंडाळा येथील फार्म हाऊसवर अथिया आणि के एल राहुल यांचा विवाहसोहळा पार पडला. लेकीच्या लग्नानंतर आता सुनील शेट्टी पुन्हा कामावर परतला आहे.