बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते धमेंद्र यांचा नातू व अभिनेता सनी देओल यांचा मुलगा करण देओल याचं लग्न १८ जून रोजी मोठ्या थाटामाटात पार पडलं. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. करण व द्रिशाच्या लग्नात, तसेच रिसेप्शनला अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली. आता करण व द्रिशा हनिमूनसाठी मनालीला गेले आहेत. यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- पहिल्या पत्नीपासून चार मुलं, घटस्फोट न घेताच धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याबरोबर थाटला होता संसार, अभिनेत्रीच्या वडिलांना नात्याबाबत कळताच…

मनालीत देओल कुटुंबाचं स्वतःचं कॉटेज आहे; ज्यामध्ये ते अनेकदा वेळ घालवण्यासाठी जातात. आता करण व द्रिशाही लग्नानंतर एकत्र वेळ व्यतीत करण्यासाठी मनालीला पोहोचले आहेत. करणने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मनालीचे काही फोटोही शेअर केले आहेत. त्यामध्ये तो कधी आपल्या पाळीव प्राण्यांसोबत खेळताना; तर कुठे फुटबॉल खेळताना दिसत आहे.

करण देओल व द्रिशा आचार्य लग्नानंतर मनालीत एकमेकांसाठी खास वेळ देत आहेत. द्रिशा आचार्यनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तेथील हनिमूनचे काही फोटो शेअर केले आहेत.

करण व द्रिशा जवळपास सहा वर्षं एकमेकांसह डेटवर होते. लग्नाअगोदर दोघांना अनेक ठिकाणी एकत्रही बघण्यात आलं होतं. द्रिशा चित्रपटात काम करत नसली तरी ती चित्रपटसृष्टीतील कुटुंबाचा एक भाग आहे. द्रिशा प्रसिद्ध चित्रपट निर्माते बिमल रॉय यांची पणती आहे. द्रिशा ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा- Video: दीपिका पदुकोण-रणवीरच्या मुंबईतील ११९ कोटींच्या नव्या घराची पहिली झलक समोर, पाहा व्हिडीओ

तर करणच्या कामाबाबत बोलायचं झालं तर करणनं ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. लवकरच तो अनिल शर्मा यांच्या ‘अपने २’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याचे आजोबा धर्मेंद्र, काका बॉबी देओल व वडील सनी देओलही दिसणार आहेत.
मोठ्या पडद्यावर देओल यांच्या या तीन पिढ्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor sunny deol son karan deol drisha acharya honeymoon photo viral dpj