प्रेम प्रत्येकालाच मिळते असे नाही. प्रेमाची व्याख्या अनेक लेखकांनी आपल्या पद्धतीने लिहून ठेवली आहे. प्रेमावर अनेक कविता लिहल्या गेल्या आहेत. माणसाच्या आयुष्यातील प्रेम हा विषय आहे. एखादी व्यक्ती व्यक्तीवर मनापासून प्रेम करते त्या व्यक्तीसाठी काहीही करण्याची तयारी असते. मात्र प्रेमात अपयश आल्यानंतर व्यक्ती नाराज होतात, मानसिक तणावात जातात. हे सामान्य व्यक्तींच्या बाबतीत नव्हे बॉलिवूड कलाकारांच्या बाबतीतदेखील घडले आहे. अभिनेता वरुण धवन कायमच चर्चेत असतो. आज बॉलिवूडमधला आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्या लूकची चर्चा होते. मात्र याच अभिनेत्याला मुलींनी नाकारले होते.
नुकताच त्याचा ‘जुग जुग जियो’ या चित्रपट येऊन गेला. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्याने त्याने खुलासा केला की ‘आजपर्यंत तुला मुलींनी कितीवेळा नाकारले आहे’. यावर वरूण धवन हसत हसत म्हणाला ‘मला खूप वेळा मुलींनी नाकारले आहे. मी लहानपणापासून अनेक मुलींना विचारले होते पण मला माहित होते कधीतरी हे पूर्ण होईल, आता नुकतेच माझे लग्न झाले आहे’. ‘जुग जुग जियो’ चित्रपटात कियारा अडवाणीने त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. अनिल कपूर, टिस्का चोप्रा नीतू सिंग यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
अविश्वसनीय सत्यकथेवर आधारलेला ‘ऐ जिंदगी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
वरूणने आपल्या बालमैत्रिणीशी लग्न केले आहे. नताशा दलाल असं तिचं नाव असून २४ जानेवारी २०२१ रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. वरूण आणि नताशा यांचा लग्नसोहळा अलिबाग येथील द मेन्शन हाऊस येथे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला होता. दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये असल्यानंतर त्यांनी लग्न केलं.
स्टुडंट ऑफ द इअर चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘बदलापूर’, ‘जून’, ‘जुडवा २’, यांसारख्या चित्रपटातून त्याने काम केले आहे. अभिनयाच्या बरोबरीने तो नृत्यदेखील चांगले करतो. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा तो मुलगा आहे. त्याचा भाऊ रोहित धवनदेखील दिग्दर्शक आहे.