बॉलीवूड अभिनेता विकी कौशल सध्या ‘सॅम बहादूर’ या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. तो या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. अशातच विकी कौशल आणि चित्रपट निर्माती मेघना गुलजार दोघेही ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या विशेष कार्यक्रम ‘एक्सप्रेस अड्डा’मध्ये सहभागी होणार आहे. हा कार्यक्रम सुमारे दोन तासांचा असणार आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस ग्रुप’चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनंत गोयंका ही मुलाखत घेतील. यावेळी चित्रपट समीक्षक शुभ्रा गुप्ताही त्यांच्याबरोबर स्टेज शेअर करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२०१८ साली ‘राझी’सारखा हिट चित्रपट दिल्यानंतर विकी कौशल आणि मेघना गुलजार ‘सॅम बहादूर’च्या माध्यमातून दुसऱ्यांदा एकत्र आले आहेत. ‘राझी’ चित्रपटगृहात हिट ठरला होता, त्यामुळे या जोडीच्या दुसऱ्या चित्रपटाला लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. हा चित्रपट १ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.