अभिनेता विकी कौशलने अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. विविधांगी भूमिका साकारत विकीने त्याच्या अभिनयाची छाप पाडली. आता लवकरच विकी कौशल ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, तख्त आणि इमोर्टल अश्वत्थामा या चित्रपटांनंतर विकीने आणखी एका ऐतिहासिक चित्रपटाची ऑफर स्वीकारली आहे. विकी कौशल त्याच्या आगामी चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. लक्ष्मण उत्तेकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे.परंतु, याबाबत विकी कौशलने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
लक्ष्मण उत्तेकर यांनी ‘मिमी’, ‘लुका छुपी’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. विकी कौशलबरोबर ते आणखी एक विनोदी चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. ‘पिपिंग मून आऊटलेट’ने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाची निर्मिती ‘दिनेश व्हिजन्स’तर्फे करण्यात येणार आहे. चित्रपटाचं लेखन पूर्ण झालं असून चित्रपटाचं नाव अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.
हेही वाचा>> ‘वेड’ चित्रपटातील सत्या व श्रावणीचं रोमँटिक गाणं प्रदर्शित, रितेश-जिनिलीयाच्या रोमान्सची दिसली झलक
विकी कौशल सध्या त्याच्या आगामी ‘सॅम बहाद्दर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो लष्करी अधिकारी ‘सॅम बहाद्दर’ यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.