शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट गेले अनेक महिने चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीव्ह्यू व्हिडिओ प्रदर्शित झाला. हा व्हिडीओ प्रदर्शित होताच काही मिनिटांतच तुफान व्हायरल झाला. या चित्रपटामध्ये शाहरुख खानबरोबर अभिनेत्री नयनतारा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये ती शाहरुख बरोबर रोमान्सही करताना दिसेल. आता त्यावर नयनताराचा पती विघ्नेश याने प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शाहरुख खानच्या या ‘जवान’ चित्रपटाच्या प्रिव्हू व्हिडीओमध्ये नयनताराचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. हा चित्रपट ॲक्शन आणि रोमान्सने भरलेला असेल. हा प्रिव्हू व्हिडिओ प्रदर्शित झाल्यानंतर विघ्नेशने सोशल मीडियावर तो व्हिडिओ शेअर करत अभिनेत्री नयनतारा आणि शाहरुखचं कौतुक केलं. तर याचवेळी त्याने नयनताराने शाहरुख बरोबर रोमान्स करण्यावरही प्रतिक्रिया दिली.

आणखी वाचा : Video: शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात ‘ही’ प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री दिसणार महत्वपूर्ण भूमिकेत, पहिली झलक समोर

विघ्नेशने ट्वीट करत शाहरुख आणि नयनताराचं कौतुक केल्यानंतर शाहरुख खानने रिप्लाय देत लिहिलं, “तू दाखवलेल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद. नयनतारा खूप छान चांगली आहे आणि हे मी तुला कोण सांगणार! तुला तर हे आधीच माहित आहे. पण सावध रहा. ती आता किक आणि पंच मारायला शिकली आहे.” तर शाहरुखच्या या ट्वीटवर रिप्लाय देत विघ्नेश म्हणाला, “हो. मी काळजी घेईन. पण मी हेही ऐकलंय की चित्रपटांमध्ये तुमचा आणि नयनताराचा रोमान्सही पाहायला मिळणार आहे. जो ती रोमान्सचा बादशहा असलेल्या तुमच्याकडून शिकली आहे. तो ती जपत आहे आणि तुमच्या बरोबर पदार्पण करायला मिळाल्यामुळे ती खूप खुश आहे. तिचं स्वप्न पूर्ण झालं.”

हेही वाचा : शाहरुख खानचा आगामी ‘जवान’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, जाणून घ्या कारण

दरम्यान, शाहरुखचा हा जवान चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होईल. या चित्रपटात शाहरुख खान नयनतारा यांच्या व्यतिरिक्त अभिनेता विजय सेतुपती नकारात्मक भूमिकेत दिसेल. तर मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओकही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.