‘गली बॉय’चित्रपटातून पुढे आलेला अभिनेता विजय वर्मा याची सध्या चांगलीच चर्चा आहे. ‘गली बॉय’मध्ये रणवीरपेक्षा जास्त कौतुक विजयचं झालं आणि अचानक विजय वर्माला चांगल्या चित्रपटात भूमिका मिळू लागल्या. पण याआधी त्याला एक भूमिका करायची इच्छा होती, पण ती सुशांत सिंग राजपुतला मिळाली, याविषयी विजयने खुलासा केला आहे.

‘काय पो चे’ या चित्रपटातून अमित साध, राजकुमार राव आणि सुशांत सिंग या तिन्ही कलाकारांच्या कारकिर्दीला एक वेगळीच दिशा मिळाली. या चित्रपटाचं, त्या विषयाचं आणि या अभिनेत्यांचं खूप कौतुक झालं. या चित्रपटाने सुशांतला बॉलिवूडमध्ये स्थैर्य मिळण्यास मदत झाली. २०१३ साली आलेल्या या चित्रपटाने तेव्हा बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती. यातील गाणीही चांगलीच हीट ठरली.

आणखी वाचा : “मी लेडी रणवीर सिंग” मॉडेल, अभिनेत्री उर्फी जावेद पुन्हा विचित्र वक्तव्यामुळे चर्चेत

‘इ टाइम्स’शी संवाद साधताना आपल्या करकीर्दीविषयी आणि चित्रपटातील संघर्षाविषयी खुलासा केला आहे. स्ट्रगलच्या दिवसाबद्दल सांगताना ‘काय पो चे’ चित्रपटाबद्दल विजयने सांगितलं. तो म्हणाला, “काय पो चेसाठी बऱ्याच लोकांच्या ऑडिशन सुरू होत्या. सुशांत सिंगने जी भूमिका केली त्यासाठी मी ऑडिशन दिली होती, आणि मी त्यात सिलेक्ट होईन अशी माझी खात्री होती. पण नेमकं माझा अंदाज चुकला, त्या पत्रासाठी ज्या गोष्टी हव्या होत्या त्या माझ्यात तेव्हा दिसल्या नसतील, कारण जेव्हा मी इतर लोकांचं कास्टिंग पाहिलं तेव्हा मला तो निर्णय योग्य होता याची जाणीव झाली. अर्थात तेव्हा वाईट वाटलं. पण हे एक कालचक्र आहे आणि याची आपल्याला सवय लागते.”

विजय वर्मा नुकताचा आलिया भट्ट आणि शेफाली शहा यांच्याबरोबर नेटफ्लिक्सच्या ‘डार्लिंग्स’ या चित्रपटात झळकला. यातील विजयच्या कामाची खूप प्रशंसा झाली. आता विजय करीना कपूर आणि जयदीप अहलावत यांच्याबरोबर सुजॉय घोष यांच्या एका चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटातून करीना कपूर प्रथमच ओटीटीविश्वात पदार्पण करणार आहे.

Story img Loader