आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या चित्रपटाची कथा मराठी अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी १४ वर्षांपूर्वीच लिहिली होती. ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूड चित्रपटाचा हा रिमेक होता. या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच नकारात्मक चर्चांचाही सामना करावा लागला. या चित्रपटाला अपयश का सहन करावं लागलं? या चित्रपटासाठी त्यांनी कितपत मेहनत घेतली? याबाबत अतुल कुलकर्णी यांनी भाष्य केलं आहे.
आणखी वाचा – Video : सलमान, शाहरुखच्या बंगल्यालाही मागे टाकेल अंकिता लोखंडेचं सासरचं घर, व्हिडीओ पाहून नेटकरीही अवाक्
‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अतुल कुलकर्णी ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाबाबत भरभरून बोलत होते. या चित्रपटामधील ‘लाल’ या पात्राने आपला देश पूर्वी कसा होता? याबाबत सुंदर आठवण प्रेक्षकांना करून दिली. तसेच आज आपल्या देशामध्ये आपल्याला काय हवं आहे? याचीही जाणीव करून दिली. चित्रपटाच्या माध्यमातून हिच आठवण करून देण्याचा तुमचा उद्देश होता का? असा प्रश्न अतुल यांना यावेळी विचारण्यात आला.
अतुल यावर उत्तर देत म्हणाले, “आपल्या देशामध्ये अस्तित्वात असणाऱ्या काही गोष्टी युएसमध्ये नाहीत. म्हणजेच धर्म किंवा दहशतवादाला तिथे जागा नाही. आपल्या देशामध्ये या गोष्टींबाबत बोललं जातं. तसेच इथे धर्मामुळे अनेक गोष्टींमध्ये निर्माण होणारा अडथळा आपण पाहिला आहे. भारतात धर्मामुळे येणाऱ्या अडचणींवर लक्ष देण्याची गरज आहे.”
आणखी वाचा – “मेरे आंखों में मत झांको…” नम्रता संभेरावची ‘लॉली’ पाहून सासूबाईंची भन्नाट प्रतिक्रिया, म्हणाल्या…
“माझ्यामते कोणत्याही प्रकरणाचं उत्तर हे धर्माशी संबंधित असू शकत नाही. प्रेम, आदर, क्षमा याच्या आधारे आपण प्रत्येक प्रश्न सोडवू शकतो. असं माझं स्पष्ट मत आहे.” म्हणजेच कोणत्याही धर्माचा प्रत्येक गोष्टींशी संबंध जोडला जाऊ नये असं अतुल यांचं स्पष्ट मत आहे.