‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. मात्र, अनेक ठिकाणी या चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी या चित्रपटाला प्रोपगंडा चित्रपटही म्हटले आहे. चित्रपटाची मुख्य अभिनेत्री अदा शर्माने ट्वीट करीत ‘द केरला स्टोरी’ला प्रोपगंडा म्हणणाऱ्या नेटकऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. अदाचे हे ट्वीट चांगलेच व्हायरल झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- “हा शेवटचा चित्रपट…” ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माचे वक्तव्य, म्हणाली “पुन्हा संधी मिळेल की नाही…”

ट्विटरवर सुफियान खान नावाच्या ट्विटर युजरने कमेंट केली की, “तुम्ही प्रोपगंडा चित्रपट बनवून पैसे कमवू शकता, पण आदर नाही.” अदाने या ट्वीटला रिट्वीट करीत उत्तर दिले आहे. अदाने ट्वीटमध्ये लिहिले आहे. “मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. धन्यवाद! आता फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून मला इतका आदर दिल्याबद्दल. अदाने दिलेल्या या उत्तराची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

नुकतीच ‘द केरला स्टोरी’ चित्रपट आणखी ४० देशांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाला देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. ‘द केरला स्टोरी’ने पहिल्या दिवशी आठ कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय केला. त्यानंतर या चित्रपटाची कमाई वाढतच गेली. ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी जादुई आकडा गाठत १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. अनेक राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी असूनही बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची पसंती मिळाल्याने, काही दिवसांतच ‘द केरला स्टोरी’ला १०० कोटींचा गल्ला जमवण्यात यश आले आहे.