अलाया फर्निचरवाला ही लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री आहे. आपल्या चार वर्षांच्या करिअरमध्ये तिने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. २०२० मध्ये ‘जवानी जानेमन’ मधून बॉलीवुड पदार्पण करणारी अलाया ही अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आहे. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती, कारण घरात तिचे आजोबा कबीर बेदी दिग्गज अभिनेते राहिलेत, तर तिची आई पूजाही अभिनेत्री आहे.
अलायाचे वडील फरहान फर्निचरवाला यांनी पूजापासून घटस्फोट घेतल्यानंतर दुसरं लग्न केलं. त्यांनी नऊ वर्षांच्या संसारानंतर २००३ मध्ये पूजापासून घटस्फोट घेतला आणि २०१० साली लैला खानशी दुसरं लग्न केलं. त्यांच्या दुसऱ्या लग्नाला आई पूजा बेदी गेली होती, असा खुलासा अलायाने केला आहे. ‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत अलाया फर्निचरवालाने तिच्या आईच्या घटस्फोटाबद्दल खुलेपणाने भाष्य केलं आहे.
पतीच्या दुसऱ्या लग्नाला गेली होती पूजा बेदी
अलाया म्हणाली, “माझे आई-वडील घटस्फोटानंतर आपापल्या वेगळ्या मार्गाने जात होते, पण मी त्यांना नेहमी पाहायचो, त्यांची एकमेकांशी खूप चांगली मैत्री होती. आजपर्यंत ते खूप चांगले मित्र आहेत. माझी आई माझ्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाला गेली होती. इतकंच नाही तर मी माझ्या सावत्र आईच्या खूप जवळ आहे. माझी आई आणि सावत्र आई दोघीही माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.”
मला भावाला सावत्र म्हणणं आवडत नाही, कारण…
मुलाखतीत अलाया म्हणाली, “माझा सावत्र भाऊ, ज्याला सावत्र भाऊ म्हणणं मला अजिबात आवडत नाही, कारण तो माझा भाऊ आहे. आमचे वडील एक आणि आई वेगळ्या आहेत. तो माझ्या हृदयाचा तुकडा आहे. माझी सावत्र आई आणि भाऊ माझ्या आयुष्यात नसतील तर ते माझ्यासाठी चांगली गोष्ट नक्कीच नसेल. माझ्या आई-वडिलांचा घटस्फोट होणं ही माझ्यासाठी नेहमीच एक सकारात्मक गोष्ट राहिली आहे, कारण ते दोघेही आपापल्या आयुष्यात आनंदी आहेत.”
आई-वडिलांचा घटस्फोट मोठी गोष्ट नाही – अलाया
अलायाचं तिच्या सावत्र आईबरोबर चांगलं नातं आहे. सावत्र आईशिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही, असं अलाया म्हणते. आई-वडिलांच्या घटस्फोटाबद्दल अलाया म्हणाली, “घटस्फोट माझ्यासाठी कधीही वाईट गोष्ट नव्हती, कारण माझ्या आई-वडिलांनी त्यांचा घटस्फोट अतिशय चांगल्या रितीने हाताळला. जेव्हा माझ्या इतर मित्रांनाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला तेव्हा मला वाटलं नाही की घटस्फोट ही फार मोठी गोष्ट आहे.”
चाळीत जन्मलेला विकी कौशल आहे उच्च शिक्षित, जाणून घ्या कतरिना कैफच्या पतीची शैक्षणिक पार्श्वभूमी
अलाया फर्निचरवाला हिच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती ‘बड़े मियां छोटे मियां’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, पृथ्वीराज सुकुमारन व मानुषी छिल्लर यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. अलायाने राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ या चित्रपटात त्याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या चित्रपट नेत्रहीन उद्योजक श्रीकांत बोल्ला यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.