अभिनेत्री आलिया भट्ट ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. तर याचबरोबर ती यशस्वी उद्द्योजिकाही आहेत. तिचा स्वतःचा लहान मुलांच्या कपड्यांचा ब्रॅंड आहे. तर आता ती आणि मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानी एकत्र येऊन व्यवसाय करणार आहेत.
आलिया भट्ट सोशल मिडियावर खूप सक्रिय असते. ती विविध पोस्ट आणि स्टोरी शेअर करत तिच्या कामबरोबरच तिच्या या व्यवसायाचीही माहिती चाहत्यांना देत असते. तर नुकतीच एक पोस्ट शेअर करत तिने एक मोठी घोषणा केली.
ईशा अंबानी ही रिलायन्स रिटेलची प्रमुख आहे.आता आलियाने नुकतीच ईशा अंबानीशी पार्टनरशीप केली आहे. आलिया भट्टचा एड-ए-मम्मा आणि ईशां अंबानीचा रिलायन्स रिटेल एकत्र येऊन आलियाचा ब्रॅंड चालवणार आहेत.आलियाने तिचा आणि ईशाचा एक फोटो शेअर करत ही बातमी सांगितली. रिलायन्स रिटेल आणि एड-ए-मम्मा यांच्या व्यवसायाचा उद्देश एकच असल्याने त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. तर ईशाचा उल्लेख करत ती म्हणाली, “आम्ही दोघी स्वतः एक आई आहोत. त्यामुळे आमच्यासाठी म्हणजे दोन आई एकत्र येत आहेत.”
हेही वाचा : “माझी सून फारच…” आलिया भट्टबद्दल स्पष्टच बोलल्या नीतू कपूर
तर आता तिची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे. ही पोस्ट वाचून तिचे चाहते खूप आनंदी झाले आहेत. या पोस्टवर कमेंट करत तिचे चाहते आणि बॉलीवूडमधील तिची मित्र मंडळी तिचं अभिनंदन करत आहेत.