बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल रणबीर कपूर व आलिया भट्ट काही महिन्यांपूर्वीच आई-बाबा झाले. आलियाने नोव्हेंबर महिन्यात एका गोंडस मुलीला जन्म दिला. कन्येच्या आगमनाने कपूर कुटुंबीय आनंदी होते. गरोदर असतानाही आलिया भट्ट चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून आली. आलियाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या प्रेग्नन्सी काळातील अनुभवावर भाष्य केलं आहे.
‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत आलिया म्हणाली, “माझी प्रेग्नन्सी ही अनपेक्षित होती. त्यामुळे माझं शरीर मला काय सांगत आहे, याकडे मी लक्ष देत होते. काम महत्त्वाचं होतं, पण त्यावेळी माझं बाळ आणि माझं स्वास्थ याला मी प्राधान्य दिलं. परंतु, सुदैवाने गरोदरपणात शारीरिक त्रासामुळे माझं काम मागे पडलं नाही. सुरुवातीच्या काही दिवसांत मला थकवा जाणवायचा, मळमळ व्हायची. पण तेव्हा मी याबाबत कोणाला काहीच बोलले नाही”.
हेही वाचा>> ‘आज मैं मूड…’, अमृता फडणवीसांचं नवीन गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; नव्या लूकची होतेय चर्चा
हेही वाचा>> ये है मोहब्बते’ फेम ‘रुही’ने १५व्या वर्षी खरेदी केलं कोट्यवधींचं घर, फोटो शेअर करत म्हणाली…
आलियाने मुलाखतीत तीन महिने प्रेग्नन्सीबाबत कोणाबरोबरही भाष्य केलं नसल्याचा खुलासाही केला. “पहिले १२ आठवडे गरोदरपणाबाबत कोणाला काही सांगायचं नसतं. म्हणून मला होणाऱ्या त्रासाबद्दली मी कोणाकडेही वाच्यता केली नाही. मी शूटिंगदरम्यान अनेकदा माझ्या व्हॅनिटी वॅनमध्ये जेवढं शक्य होईल तितका आराम करायचे. जानेवारी २०२२ मध्ये मी ‘हार्ट ऑफ स्टोन’ हा माझा पहिलाच हॉलिवूड चित्रपट साइन केला होता. त्यामुळे त्याचं शूटिंग पूर्ण करणं गरजेचं होतं. गरोदर असताना मी माझ्या पहिल्या अक्शन चित्रपटांचं शूटिंग केलं आहे”, असं आलियाने मुलाखतीत सांगितलं.
हेही वाचा>> Video: बिग बॉसने दिलेलं सरप्राइज पाहून राखी सावंत रडली, चाहते म्हणतात “हिच्या नादात प्रसादला…”
आलिया व रणबीरने १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यानंतर काहीच महिन्यांत त्यांनी आई-बाबा होणार असल्याची गूडन्यूज चाहत्यांना दिली. ६ नोव्हेंबरला आलियाला कन्यारत्नाची प्राप्ती झाली. आलिया-रणबीरने त्यांच्या मुलीचं नाव ‘राहा’ असं ठेवलं आहे.