अभिनेत्री आलिया भट्टने ६ नोव्हेंबरला गोंडस मुलीला जन्म दिला. नुकतेच आई-बाबा झालेले रणबीर कपूर व आलिया भट्ट बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत. आलिया-रणबीरने त्यांच्या लेकीचं नाव ‘राहा’ असं ठेवलं आहे. लग्नानंतर अवघ्या काहीच महिन्यांतच आई झालेल्या आलियाला ट्रोल करण्यात आलं होतं.

आलियाने नुकत्याच ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या प्रेग्नन्सी काळातील अनुभवावर भाष्य केलं आहे. यावेळी तिची प्रेग्नन्सी ही अनपेक्षित असल्याचा खुलासाही तिने केला. आलिया म्हणाली, “प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या काही दिवसांत मला थकवा जाणवायचा, मळमळ व्हायची. मी शूटिंगदरम्यान अनेकदा माझ्या व्हॅनिटी वॅनमध्ये जेवढं शक्य होईल तितका आराम करायचे. जानेवारी २०२२ मध्ये मी ‘हार्ट ऑफ स्टोन’ हा माझा पहिलाच हॉलिवूड चित्रपट साइन केला होता. त्यामुळे त्याचं शूटिंग पूर्ण करणं गरजेचं होतं. गरोदर असताना मी माझ्या पहिल्या अक्शन चित्रपटांचं शूटिंग केलं आहे”.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Priya Berde
प्रिया बेर्डे यांना भविष्यात साकारायचीय ‘ही’ व्यक्तिरेखा, म्हणाल्या, “माझ्या आईने…”
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
rekha lata mangeshkar
“देवा पुढल्या जन्मी…”, रेखा यांनी सांगितला लता मंगेशकरांबद्दलचा ‘तो’ किस्सा; म्हणाल्या, “मला त्यांनी…”

हेही वाचा>> “…म्हणून मी गरोदर असल्याचं सगळ्यांपासून लपवलं”, आलिया भट्टचा खुलासा

हेही वाचा>> Video: बिग बॉसने दिलेलं सरप्राइज पाहून राखी सावंत रडली, चाहते म्हणतात “हिच्या नादात प्रसादला…”

पुढे आलिया म्हणाली, “माझी प्रेग्नन्सी ही अनपेक्षित होती. त्यामुळे माझं शरीर मला काय सांगत आहे, याकडे मी लक्ष देत होते. काम महत्त्वाचं होतं, पण त्यावेळी माझं बाळ आणि माझं स्वास्थ याला मी प्राधान्य दिलं. परंतु, सुदैवाने गरोदरपणात शारीरिक त्रासामुळे माझं काम मागे पडलं नाही. पहिले १२ आठवडे गरोदरपणाबाबत कोणाला काही सांगायचं नसतं. त्यामुळे या काळात मला होणाऱ्या त्रासाबाबतही मी कोणालाच काही बोलले नाही”.

हेही वाचा>> तमन्ना भाटिया करतेय ‘डार्लिंग’ फेम विजय वर्माला डेट? किस करतानाचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

आलिया व रणबीरने १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यानंतर काहीच महिन्यांत त्यांनी आई-बाबा होणार असल्याची गूडन्यूज चाहत्यांना दिली. २०२३च्या एप्रिल महिन्यात त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत आहे.

Story img Loader