बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच आई-बाबा होणार आहेत. नव्या पाहुण्याच्या आगमनासाठी कपूर कुटुंबियांकडून जय्यत तयारी केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच आलियाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सोहळा पार पडला. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

आलियाने तिचा प्रेग्नेसी काळ खूप एन्जॉय केला. या काळातही ती ‘ब्रह्मास्र’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेली दिसली. अनेक ठिकाणी आलिया बेबी बंप फ्लॉन्ट करतानादेखील दिसून आली. यादरम्यानचे रणबीर-आलियाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. प्रेग्नेन्सी काळात रणबीर आलियाची काळजी घेताना दिसून आला. नुकतंच आलियाने मॅटर्निटी फोटोशूटही केलं आहे. आता आलियाचं बाळ कोणत्या रुग्णालयात जन्माला येणार याबाबत माहिती समोर आली आहे.

akshay kumar
‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
life sentence prisoner escapes from yerawada jail pune
येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार
23 year old woman drowned her one year old son in water tank in Washind area of ​​Bhiwandi
जन्मदात्या आईकडूनच मुलाची हत्या
unknown people beaten up doctor by saying not treating girl properly
ठाणे : मुलीवर व्यवस्थित उपचार केले नसल्याचे म्हणत डॉक्टरला मारहाण
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो

हेही वाचा >> Bigg Boss 16: …अन् शिव ठाकरेमुळे निमृत ढसाढसा रडू लागली; दोघांमधील कडक्याच्या भांडणाचं कारण काय? पाहा व्हिडीओ

हेही पाहा >> Photos : आलिया भट्टने पहिल्यांदाच केलं मॅटर्निटी फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं पाऊट

‘पिंकविला’ने दिलेल्या माहितीनुसार, आलिया भट्टचं नाव गिरगावातील एका रुग्णालयात नोंदविण्यात आलं आहे. कपूर कुटुंबियांच्या जवळच्या व्यक्तीने याबाबत माहिती दिली आहे. गिरगाव येथील ‘एच.एन.रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल’मध्ये आलिया तिच्या बाळाला जन्म देणार आहे.

हेही वाचा >> “कॉम्प्रोमाईझ करशील का? असं विचारल्यावर मी त्याच्या कानाखाली…”, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नगाठ बांधून त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच ते आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी त्यांनी चाहत्यांना दिली. कपूर कुटुंबियांप्रमाणेच चाहतेही आलिया-रणबीरच्या बाळासाठी आतुर आहेत. नोव्हेंबर महिन्यातील शेवटच्या किंवा डिसेंबरमधील पहिल्या आठवड्यात आलिया तिच्या बाळाला जन्म देणार आहे.

Story img Loader