अभिनेत्री अमीषा पटेल सध्या तिच्या ‘गदर २’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तब्बल २२ वर्षांनी चित्रपटाचा सिक्वेल पाहता येणार असल्याने चाहते उत्सुक आहेत. अशातच अमीषा पटेल रांचीच्या दिवाणी न्यायालयात हजर झाली. अमीषा चेहरा झाकून कोर्टात पोहोचली. चेक बाऊन्स प्रकरणात तिच्याविरोधात कोर्टाने वॉरंट जारी केले होते, त्यानंतर आज अमीषा कोर्टात हजर झाली.

हेही वाचा – Video: नातवाच्या लग्नात धर्मेंद्रनी धरला ठेका; सनी देओलने तारा सिंग बनून केला जोरदार डान्स; करण-द्रिशाच्या संगीत समारंभाचे व्हिडीओ व्हायरल

siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Anjali Damania on Walmik Karad
Anjali Damania : संतोष देशमुख हत्याप्रकरणात अंजली दमानिया यांचा आणखी एक गौप्यस्फोट, PCR ची प्रत शेअर करत म्हणाल्या…
Marathi Actress Tejashri Pradhan exit from Premachi goshta marathi serial
तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून एक्झिट! आता मुक्ताच्या भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री
What Jitendra Awhad Said About Walmik Karad?
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य, “वाल्मिक कराड ताब्यात आला पण आका अजूनही…”
Walmik Karad surrenders, Walmik Karad ,
पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडचे आत्मसमर्पण, वडेट्टीवारांचा दावा
Bajarang Sonavane Reaction on Walmik Karad
Bajrang Sonavane : वाल्मिक कराड शरण आल्यानंतर बजरंग सोनावणेंची पहिली प्रतिक्रिया, “सीआयडीने आता…”

अमीषा पटेल आज (१७ जून) रोजी झारखंडमधील रांची कोर्टात पोहोचली. कोर्टाने १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर केला आहे. पण तिला २१ जून रोजी पुन्हा एकदा कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. २१ तारखेला ती हजर झाली नाही तर तिचा जामीन रद्द केला जाऊ शकतो. या संदर्भात ‘एएनआय’ने वृत्त दिलंय.

नेमकं प्रकरण काय?

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, अरगोरा येथील रहिवासी अजय कुमार सिंह यांनी २०१८ मध्ये अभिनेत्रीवर गुन्हा दाखल केला होता. तक्रारीतील आरोपानुसार, अमीषा पटेलने चित्रपट बनवण्याच्या नावाखाली त्याच्याकडून अडीच कोटी रुपये घेतले होते, पण हा चित्रपट बनू शकला नाही आणि अमीषाने पैसेही परत केले नाहीत.

‘आदिपुरुष’वरील वादादरम्यान कंगना रणौतची पोस्ट चर्चेत, फोटो शेअर करत म्हणाली, “रामाचे नाव…”

अजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार, अमीषा पटेल आणि तिचा भागीदार क्रुणालने चित्रपट पूर्ण झाल्यानंतर व्याजासह पैसे परत करणार असल्याचे सांगितले होते. ‘देसी मॅजिक’ नावाच्या चित्रपटाचे शूटिंग २०१३ मध्ये सुरू झाले होते. मात्र, हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. तसेच चित्रपट निर्मात्याने अमीषा पटेलकडे पैसे मागितल्यावर तिने परत केले नाहीत. नंतर तिने ऑक्टोबर २०१८ मध्ये त्याला २.५ कोटी आणि ५० लाख रुपयांचे दोन चेक दिले होते, पण ते बाऊन्स झाले होते.

Story img Loader