२००० साली ‘कहो ना प्यार है’ या चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपरहिट ठरला. या चित्रपटातून हृतिकचा रोशन आणि अमिषा पटेल यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. पण अमीषा पटेलच्या जागी या चित्रपटामध्ये करीना कपूर प्रमुख भूमिका साकारणार होती. पण काही कारणाने तिने हा चित्रपट सोडला असं समोर आलं होतं. पण आता अमीषा पटेल हिने एक वेगळाच खुलासा केला आहे.
अमीषा पटेल सध्या ‘गदर २’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. या निमित्ताने गेल्या काही दिवसांमध्ये तिने अनेक मुलाखती दिल्या. नुकतीच तिने ‘बॉलीवूड बबल’ला एक मुलाखत दिली. त्यामध्ये तिने ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. करीना कपूरने स्वतः हा चित्रपट सोडला नव्हता तर तिला या चित्रपटातून दिग्दर्शक-निर्मात्यांनीच बाहेर पडायला सांगितलं होतं, असा खुलासा अमीषा पटेलने केला आहे.
आणखी वाचा : हटके फर्निचर ते प्रशस्त बेडरूम…’असे’ आहे करीना कपूरचे मुंबईतील घर, पहा Inside photos
ती म्हणाली, “खरं तर करीनाने स्वतः हा चित्रपट सोडला नव्हता. करीनाशी मतभेद झाल्यामुळे राकेश रोशन यांनी तिला हा चित्रपट सोडण्यास सांगितलं होतं असं मला स्वतः राकेशजींनी सांगितलेलं. राकेशजींच्या पत्नी पिंकी ऑंटी यांनी मला सांगितलं होतं की, या गोष्टीचं त्यांना खूप आश्चर्य वाटलं होतं. कारण चित्रपटाचा सेट बनवून तयार होता, आणि सोनियाची जागा तीन दिवसांत शोधायची होती.”
हेही वाचा : Video : “शेवटी त्यांची लायकी…,” करीना कपूरची चाहतीशी वर्तणूक पाहून नेटकऱ्यांचा संताप
पुढे ती म्हणाली, “या चित्रपटाचा सेट तयार करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च आला होता. त्यात हृतिकचा पहिलाच चित्रपट असल्यामुळे सर्वजणच काळजीत होते. राकेशजींनी मला त्या दिवशी एका लग्नात पाहिलं होतं. त्या रात्री ते झोपू शकले नव्हते आणि ते त्यांना म्हणालेले की, मला माझी सोनिया सापडली आहे. मला आशा आहे की ती हो म्हणेल, असं राकेशजी पिंकीजींना म्हणाले होते असं पिंकीजींनी मला सांगितलं होतं.”