बॉलीवूड कलाकार आणि त्यांची लग्न हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. राजेशाही थाटात, धुमधडाक्यात स्टार्स विवाह बंधनात अडकतात. या लग्नासाठी ते कोट्यवधींचा खर्च करतात. मात्र एक अभिनेत्री याला अपवाद ठरली. साधारण बॉलीवूड कलाकारांच्या लग्नात त्यांच्या एका शेरवानीवर जितका खर्च केला जातो, तेवढ्या पैशांमध्ये तिने अख्खं लग्न केलं होतं. ही अभिनेत्री म्हणजे अमृता राव.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री अमृता राव ही एकेकाळी बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. तिने अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. पण ‘विवाह’ या तिने चित्रपटाने तिला वेगळी ओळख मिळवून दिली. तिचा चाहतावर्ग प्रचंड वाढला. २०१४ मध्ये तिने आर.जे अनमोल सूदशी लग्न केलं. इतर बॉलीवूड कलाकारांच्या तुलनेत त्यांनी त्यांचा लग्न सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने आणि खूप कमी खर्चात केला. आता जवळपास ९ वर्षांनी याचा खुलासा झाला आहे.

आणखी वाचा : “मी ते ऐकलं आणि…,” भारतात ‘जिजू’ म्हटलं जाण्याबाबत अखेर निक जोनासने दिली प्रतिक्रिया

या दोघांनी मिळून त्यांचं पुस्तक प्रकाशित केलं. त्यात त्यांनी त्यांच्या लग्नाची माहिती दिली आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, त्यांनी त्यांचं लग्न अत्यंत साध्या पद्धतीने केलं. पुण्यातील कात्रज परिसरातील इस्कॉन मंदिरात त्यांनी लग्नगाठ बांधली. लग्नस्थळ, तिथे येण्या-जाण्याचा खर्च, त्या दोघांचे कपडे यावर एकूण मिळून त्यांनी फक्त १.५ लाख त्यांनी खर्च केले. अमृताने अनमोलला आधीच सांगितलं होतं की, लग्नामध्ये तिला कोणताही डिझायनर लेहेंगा परिधान करायचा नाही. तिने तिच्या लग्नाच्या कपड्यांवर फक्त ३ हजार रुपये खर्च केला आणि विवाहस्थळाचं भाडं म्हणून त्यांनी ११ हजार रुपये खर्च केले.”

हेही वाचा : परिणीतीचा शाही थाट! साखरपुड्यात अभिनेत्रीने राघव चड्ढाला घातली ‘इतक्या’ किमतीची अंगठी

अमृता आणि अनमोल यांचा संसार अत्यंत सुखात सुरू आहे. आता त्या दोघांना एक मुलगा आहे. ‘विवाह’ चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अमृताला अमेरिका, कॅनडा अशा विविध देशांमधून लग्नासाठी अनेक मागण्या येत होत्या. लोक परदेशातील त्यांच्या घरांचे फोटोही तिला पाठवायचे, असा खुलासा नुकताच तिने ‘राजश्री प्रोडक्शन’च्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress amrita rao spent only 1 5 lakh on her wedding they keep it very lowkey rnv