आयुष्मान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल २’ हा चित्रपट गेले अनेक दिवस चांगलाच चर्चेत आहे. आपल्या आवाजाच्या जादूने सर्वांना वेड लावणारी पूजा ‘ड्रीम गर्ल २’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून पुन्हा एकदा हे पात्र आयुष्मान खुराना साकारताना दिसणार आहे. नुकतीच या चित्रपटातील एक झलक त्याने त्याचा सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली. आयुष्मान खुरानाला स्त्री वेषात पाहून अभिनेत्री अमृता खानविलकर फिदा झाली आहे.

आयुष्मान खुरानाने नुकतंच या चित्रपटाचं एक नवीन पोस्टर शेअर केलं. या पोस्टरमध्ये आयुष्मान खुराना पूजाच्या वेशभूषेमध्ये लिपस्टिक लावताना दिसत आहे. त्याच्या या फोटोवर अमृता खानविलकरने केलेल्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधले आहे.

आणखी वाचा : ‘आदिपुरुष’चा ट्रेलर पाहून अमृता खानविलकरने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाली…

आयुष्मानचा हा फोटो सोशल मीडियावर येताच तुफान व्हायरल होऊ लागला. या फोटोवर त्याच्या चाहत्यांबरोबरच मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी कमेंट करत त्याचा हा अंदाज आवडल्याचं सांगितलं. अमृता खानविलकर देखील त्याला पाहून फिदा झाली. आयुष्मानच्या या फोटोवर कमेंट करत तिने लिहिलं, “अरे कोणीतरी शिट्टी वाजवा…” तिच्या या कमेंटला लाईक देत अनेकांनी तिच्या या प्रतिक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

हेही वाचा : पतीने दिलेल्या बोल्ड सीन्सवर ‘अशी’ होती अमृता खानविलकरची प्रतिक्रिया, खुलासा करत हिमांशू म्हणाला…

दरम्यान, आयुष्मान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल २’ हा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अनन्या पांडे, परेश रावल, राजपाल यादव, असरानी, विजय राज, मनोज जोशी, सीमा पाहवा, अभिषेक बॅनर्जी आणि मनज्योत सिंह यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन राज शांडिल्य करत आहेत, तर एकता कपूर या चित्रपटाची निर्माती आहे.

Story img Loader