‘आदिपुरुष’ या चित्रपटाची गेले अनेक दिवस प्रचंड चर्चा आहे. ओम राऊत यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन या चित्रपटामध्ये सीतेच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. तर त्यानंतर आता कालच या चित्रपटातील पहिलं बहुप्रतिक्षित गाणं प्रदर्शित झालं आहे.

‘आदिपुरुष’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर बॅकग्राउंडला सुरू असणाऱ्या ‘जय श्री राम’ गाण्याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर ‘जय श्री राम’ हे ‘आदिपुरुष’मधील गाणं काल प्रदर्शित झालं. या गाण्याला यूट्यूबवर तासाभरातच लाखो व्ह्यूज मिळाले. या गाण्याच्या लॉन्चचा सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न झाला. यावेळी अजय अतुल यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह हे गाणं लाइव्ह गायलं. आता या गाण्यावर अमृता खानविलकरने प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा : कलाकारांना तगडी फी, व्हीएफएक्सवर मोठा खर्च; ‘आदिपुरुष’चं बजेट माहितेय का? आकडा वाचून व्हाल आवाक्

काल हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर अजय-अतुल यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर हे गाणं काल संपन्न झालेल्या कार्यक्रमात लाइव्ह गातानाचा एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ त्यांनी शेअर करताच खूप चर्चेत आला. त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. “जय श्रीराम”, “तुमचं गाणं खूप आवडलं” असं म्हणत अजय-अतुल यांच्या पोस्टवर कमेंट केल्या. अभिनेत्री अमृता खानविलकर हिने देखील हा व्हिडीओ पाहिला आणि ती भारावून गेली. तिने या पोस्टवर कमेंट करत लिहिलं, “खरोखर जादुई…” आता अजय-अतुल यांच्या पोस्टवरील अमृताच्या या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा : ‘आदिपुरुष’ चित्रपटासाठी मिळालेल्या मानधनाबाबत देवदत्त नागेचा मोठा खुलासा, म्हणाला…

दरम्यान, ‘आदिपुरुष’  हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. या चित्रपटात प्रभास आणि क्रिती यांच्याशिवाय रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान दिसणार आहे, तर मराठमोळा देवदत्त नागे या चित्रपटामध्ये हनुमानाची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होईल.

Story img Loader