‘एक दीवाना था’, ‘सिंह इज ब्लिंग’ अशा बॉलीवूड चित्रपटात झळकलेली अभिनेत्री एमी जॅक्सन नेहमी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा एमी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे तिचा साखरपुडा. हो, एमीने लोकप्रिय टीव्ही सीरिज ‘गॉसिप गर्ल’मध्ये चक बॅस म्हणजेच ब्रिटीश अभिनेता ॲड वेस्टविकबरोबर स्वित्झर्लंडमध्ये साखरपुडा केला आहे. याचे फोटो अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनेत्री एमी जॅक्सनने ‘होकार’ असं कॅप्शन देत साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये बर्फाळ डोंगराजवळ असलेल्या एका ब्रीजवर अभिनेता अ‍ॅड वेस्टविक एमीला प्रपोज करताना दिसत आहे. एमीने होकार दिला असून दोघं हा आनंद साजरा करताना दोघं पाहायला मिळत आहेत. दोघांचे हे फोटो खूपच व्हायरल झाले आहेत.

aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Premachi Goshta Fame Rajas Sule went on trip to new zealand with wife after wedding 19 days
लग्नाच्या १९ दिवसांनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेता ‘या’ देशात गेला फिरायला, पत्नी फोटो शेअर करत म्हणाली…
premachi goshta after tejashri pradhan exit now this actress will play mukta role
तेजश्री प्रधानने मालिका सोडल्यावर ‘प्रेमाची गोष्ट’च्या सेटवर आली नवीन ‘मुक्ता’! शेअर केला स्क्रिप्टचा पहिला फोटो…
Constable Manju Fame Marathi Actor Wedding
‘कॉन्स्टेबल मंजू’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! पत्नी देखील आहे अभिनेत्री, ‘या’ मालिकेत केलंय काम, लग्नातील फोटो आले समोर

हेही वाचा – “सलमान भाईसमोर अभिषेक नावाची…”, ‘बिग बॉस ओटीटी २’मधील सदस्याने भाईजानला लगावला टोला, म्हणाला…

एमी अ‍ॅडच्या आधी जॉर्ज पानायियोटौ (George Panayiotou) बरोबर रिलेशनशिपमध्ये होती. २०१९मध्ये जॉर्जने एमीला प्रपोज केलं होतं. त्यानंतर दोघं लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. यावेळीच एमी लग्न न करताना एका मुलाची आई झाली. २०१९मध्ये अभिनेत्रीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. पण काही काळानंतर एमी व जॉर्ज वेगळे झाले. त्यानंतर एमीच्या आयुष्यात अ‍ॅड वेस्टविकची एन्ट्री झाली.

२०२२पासून एमी व अ‍ॅडने एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. गेल्या वर्षी अ‍ॅड मुंबईत आला होता. तेव्हा दोघांचा गेट वे ऑफ इंडियासमोरचा लिपलॉक करतानाचा फोटो तुफान व्हायरल झाला होता. आता दोघांनी साखरपुडा केला असून अनेक सेलिब्रिटींसह चाहते शुभेच्छा देत आहेत.

हेही वाचा – Bigg Boss 17चा विजेता मुनव्वर फारुकीचा पहिला पगार किती होता माहितेय? जाणून घ्या…

दरम्यान, एमीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच ती ‘क्रॅक’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यामध्ये विद्युत जामवाला, नोरा फतेही आणि अर्जुन रामपाल या कलाकारांबरोबर ती स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. एमीने २०१२ साली ‘एक दीवाना था’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं.

Story img Loader